Advertisement

अखेर शाळांचं शैक्षणिक वर्ष सुरू, मार्गदर्शक तत्वे लवकरच

शाळांचं शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. सोमवार १५ जून २०२० रोजी शालेय शिक्षण विभागासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ही मान्यता दिली.

अखेर शाळांचं शैक्षणिक वर्ष सुरू, मार्गदर्शक तत्वे लवकरच
SHARES

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या शाळा पुन्हा केव्हा सुरु होणार याकडे राज्यातील पालक आणि विद्यार्थ्यांचं लक्ष लागलेलं असताना शाळांचं शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. सोमवार १५ जून २०२० रोजी शालेय शिक्षण विभागासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ही मान्यता दिली.

शाळांचं नवं शैक्षणिक वर्ष हे सोमवार १५ जून २०२० पासून ऑनलाईन / डिजिटल माध्यमातून सुरू होणार आहे. याबात सविस्तर मार्गदर्शक सूचना लवकरच कळविण्यात येतील, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

सोमवार १५ जूनपासून नवं शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याचं याआधीच राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं होतं. त्यानुसार सोमवारी शाळेचा पहिला दिवस सुरु होत असताना शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना शाळांमध्ये उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरू करण्यासंबंधीच्या मार्गदर्शक तत्वांना मंजूरी दिली आहे. 

हेही वाचा- सोमवारपासून ऑनलाइन शिक्षण सुरू; विद्यार्थी, पालकांमध्ये उत्साह

त्याप्रमाणे कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या तसंच ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात येणार आहेत. तर कुठलीच सोय नसलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी ग्रामपंचायतीच्या मदतीने टीव्ही, रेडिओची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याशिवाय गुगल क्लासरूम, प्रायोगिक तत्त्वावर वेबिनार, ई-शैक्षणिक साहित्य निर्मिती करण्यावरही विभागाने आधीच भर दिलेला आहे. सायबर सुरक्षा, दीक्षा मोबाईल ॲप, शाळेच्या स्पीकरवरून विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक माहिती अशा बाबींवर देखील बैठकीत चर्चा झाली.

शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध व्हावेत यासाठी शिक्षकांची कोरोना ड्युटी रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पंचनामे लवकर व्हावे, शाळा निर्जंतुकीकरण खर्च १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून द्यावा, परजिल्ह्यांतून शिक्षकांना इतर जिल्ह्यांत प्रवासासाठी परवानगी, सादिल अनुदान, वेतनेतर अनुदान मान्यता व निधी, सफाई कामगार या मुद्द्यांवरही विचारविनिमय झाला आहे.

हेही वाचा- दहावी-बारावीच्या निकालांची तारीख जाहीर केलेली नाही, मंडळाकडून खुलासा


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा