पालघर आणि विरारमध्ये पावसाचा जोर वाढला

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईला लागून विरार आणि पालघरमध्ये मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली आहे. गेले ३ दिवस या भागात मुसळधार पाऊस पडत आहे. पण गुरुवारी सकाळपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता. पण संध्याकाळपासून पुन्हा एकदा पावसानं जोर धरला आहे.

गुजरातच्या दक्षिणेकडील चक्रीवादळ अभिसरण पालघरच्या जवळ आहे. हे चक्रीवादळ दक्षिणेकडून उत्तरेच्या दिशेनं पुढे जात आहे. बंगालच्या उपसागरावरील एलपीए पुढे गेला आहे आणि तो प्रभावी नाही. सायंकाळपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता होती. त्यानुसार पावसानं जोर धरला आहे.

गेल्या ३ दिवसांपासून पावसानं त्रस्त झालेल्या मुंबईकरांसाठी आता आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारा 'विहार तलाव' ओसंडून वाहत आहे. गेल्या ३ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बुधवारी रात्री तलाव ओसंडून वाहू लागला. यापूर्वी काही दिवस आधी २७ जुलै रोजी 'तुळशी तलाव'देखील ओसंडून वाहत होता. 'तुळशी तालाब' मुंबईलाही पाणीपुरवठा करतो.

यावर्षी मुंबईत झालेल्या पावसानं मागील ४६ वर्षाचा विक्रम मोडला. ऑगस्टमध्ये १९७४ मध्ये कुलाबात सर्वाधिक पाऊस २६२ मिमी पावसाची नोंद झाली. तर बुधवारी २९३.८ मिमी नोंदवला गेला.


हेही वाचा

निसर्गाचं रौद्ररुप! पावसाने २४ तासात मुंबईचं ‘इतकं’ केलं नुकसान

Mumbai Rains : गेल्या १२ तासात पडलेल्या पावसानं मोडला ४६ वर्षांचा रेकॉर्ड

पुढील बातमी
इतर बातम्या