मुसळधार पावसाचे ४ बळी

  • मुंबई लाइव्ह टीम & नवनाथ भोसले
  • सिविक

मुंबई अाणि अासपासच्या परिसरात शनिवारी रात्रीपासून सलग पाऊस सुरू अाहे. सोमवारी झालेल्या मुसळधार पावसात ३ जणांना अापले प्राण गमवावे लागले. मरिन लाइन्स येथे एमजी रोडवर मेट्रो सिनेमाजवळ रविवारी झाडाची फांदी पडून दोघांचा मृत्यू झाला. तर ५ जखमी झाले. 

ठाण्यातील वाडोल गावात सोमवारी सकाळी २ घरांची भिंत कोसळून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या घटनेत या मुलाचे अाई, वडील जखमी झाले अाहेत. नवी मुंबईतील एका तलावात फेजान सिद्दीकी (१८), अबिदी सिद्दीकी (३५), रेहान सिद्दीकी (१८) हे तिघे जण बुडाले. यातील एकाचा मृतदेह हाती लागला अाहे.  अागामी १२ तासात पावसाचा अाणखी जोर वाढू शकतो, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला अाहे.

वडाळामध्ये इमारतीची भिंत पडली

दक्षिण मुंबईतील वडाळामध्ये लॉयड्स एस्टेट या इमारतीच्या कंपाऊंडच्या भिंतींता एक हिस्सा पडल्याने १५ वाहनांचं नुकसान झालं. या घटनेनंतर इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना इमारत रिकामी करण्याचा अादेश देण्यात अाला अाहे. तर या प्रकरणी दोस्ती बिल्डर्सवर गुन्हा नोंदवला गेला अाहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम अाणि स्थानिक नगरसेवक यांनी या घटनेला मुंबई महापालिकेला जबाबदार धरलं अाहे.  मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाणी भरल्याने जेवीएलअार पूल, विक्रोळी, खार, मिलन सबवे अाणि  अंधेरी सबवे या ठिकाणी वाहतूक संथ अाहे. 


हेही वाचा -

पावसामुळे अॅन्टाॅप हिलमधील लॉयड्स इस्टेट इमारतीला तडे

वडाळ्यात रस्ता खचून संरक्षक भिंत कोसळली


पुढील बातमी
इतर बातम्या