Advertisement

वडाळ्यात रस्ता खचून संरक्षक भिंत कोसळली


वडाळ्यात रस्ता खचून संरक्षक भिंत कोसळली
SHARES

मुंबईत रविवारी मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असतानाच सोमवारी पहाटे वडाळा येथील अँटॉप हिल परिसरातील विद्यालंकार कॉलेजजवळ इमारतीचं बांधकाम सुरू असताना रस्ता खचून संरक्षक भिंत कोसळली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नसलं तरी ढिगाऱ्याखाली सात गाड्या दबल्या. दरम्यान अग्निशमन दलाने ढिगारा उपसून या गाड्या बाहेर काढल्या.सात गाड्यांचं नुकसान

जोरदार पाऊस सुरू असताना अँटॉप हिलच्या संगमनगर परिसरात सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली. या घटनेत सुमारे सात गाड्यांचं नुकसान झालं आहे. यामुळे रस्त्यावर मोठा खड्डाच पडला असून यात सात गाड्यांचं नुकसान झालं आहे.


मुंबईत शनिवारपासून पडत असलेल्या पावसाने रविवारी चांगलाच जोर धरला. सोमवारी पहाटे देखील मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे वडाळ्यातील विद्यालंकार कॉलेजजवळील लॉएड्स इस्टेट परिसरात रस्ता खचला.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा