Fair And Lovely : 'फेअर' हा शब्द होणार गायब, कंपनीचा मोठा निर्णय

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

Fair & Lovely च्या जाहीराती आपण सर्वच लहानपणापासून  पाहत आलो आहत. आपल्यापैकी बहुतांश महिला त्याचा वापर करतात. आता तर पुरुषांचं देखील Fair & Lovely बाजारात विक्रिसाठी उपलब्ध आहे. सर्वांच्या पसंतीस उतरलेला हा बँड आपलं नाव बदलणार आहे. बदलणार आहे म्हणजे त्यातील फेअर हा शब्द गायब होणार आहे.

१९७५ साली म्हणजे ४५ वर्षांपूर्वी हिंदुस्तान युनिलिव्हरनं (Hindustan Unilever) एक गोरं करणारी क्रिम म्हणून फेअर अँड लव्हली लाँच केली होती. मात्र फेअर अँड लव्हलीमधील फेअर या शब्दामुळे गोरेपणा आणि उजळपणावर जास्त भर दिला जातो आहे. त्यामुळे कंपनीवर अनेकदा रंगभेद (White & Black) करत असल्याची, गोरेपणाच्या (Fairness) आकर्षणाचा व्यापार करत असल्याची टीकाही झाली. त्यामुळे आता आपल्या या ब्रँडचं नाव बदलण्याचा निर्णय कंपनीनं घेतला आहे. लवकरच यातून फेअर हा शब्द काढला जाणार आणि नवं नाव दिलं जाणार आहे.

रॉयटर्सच्या बातमीनुसार, दक्षिण आशियातील युनिलिव्हर स्किन लाइटनिंग क्रिमच्या मार्केटिंगमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे. कारण गोरं करणाऱ्या क्रिमचा सोशल मीडियावर आणि इतर ठिकाणीही विरोध केला जातो आहे. सौंदर्य फक्त गोरेपणाशी किंवा उजळपणापुरतंच मर्यादित नाही. त्यामुळे फेअरनेस, व्हाइटनिंग, लाइटनिंग असे शब्दच हिंदुस्थान लिव्हरच्या स्कीन केअर उत्पादनांमध्ये नसणार आहेत, असं कंपनीने सांगितलं आहे.

यापुढे फेअर अँड लव्हलीमधील फेअर हा शब्द वगळला जाणार आहे. या फेअरनेस क्रीमचं नवं नाव काय असेल? ते संबंधित नियंत्रकांच्या परवानगीनंतर निश्चित होईल. नवा ब्रँड वेगवेगळ्या स्किन टोनच्या महिलांवर केंद्रीत असेल, असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा

Salons Open: २८ जूनपासून सलून सुरू, फक्त केसच कापणार

आठवड्यात मुंबईत सील केल्या १ हजार इमारती

पुढील बातमी
इतर बातम्या