Advertisement

आठवड्यात मुंबईत सील केल्या १ हजार इमारती

मुंबई उपनगरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने मागील ८ दिवसांत आणखी १ हजार इमारती सील करण्यात आल्या आहेत.

आठवड्यात मुंबईत सील केल्या १ हजार इमारती
SHARES

मुंबई उपनगरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने मागील ८ दिवसांत आणखी १ हजार इमारती सील करण्यात आल्या आहेत. पालिकेच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत मुंबईत सील केलेल्या इमारतींची संख्या ५९५१ झाली आहे. १६ जूनपर्यंत ४८५९ इमारती सील केल्या होत्या. 


मागील एका आठवड्यात के पूर्व वाॅर्ड (अंधेरी पूर्व, विलेपार्ले) मध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर आर मध्य (बोरिवली) मध्ये , पी उत्तर (मालाड) येथे ४७१ आणि टी वार्डमध्ये ४५४ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे नवीन १ हजार इमारती सील करण्यात आल्या आहेत. 


सोमवारी मलबार हिल येथील नेपीयन्सी रोडवरील ताहनी हाइट्स या इमारतीत ७ दिवसांमध्ये  २१ कोरोनाचे रूग्ण सापडल्याने ही इमारत महापालिकेने सील केली आहे. डी वॉर्डमध्ये येणाऱ्या मलबार हिल, गावदेवी आणि नेपीयन्सी रोडवड सारख्या उच्चभ्रू परिसरात कोरोनाने शिरकाव केला आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये निवासी संकुलांमध्ये कोरोनाचे अधिक रुग्ण सापडले आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव घटला असून निवासी संकुलामध्ये कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 



हेही वाचा -

अंधेरी बनला कोरोनाचा नवा हॉटस्पॉट

मुख्यमंत्र्यांच्या 'मातोश्री' परिसरात कोरोनाचा शिरकाव

Cops Track Down 44 ‘Missing’ Covid Patients : ‘त्या’ बेपत्ता रुग्णांना शोधण्यात यश




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा