धारावी (dharavi) पुनर्विकास प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण करून मार्च 2028 पर्यंत लाभार्थ्यांना घरे हस्तांतरित करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी सोमवारी दिली.
या टप्प्यात किमान दहा हजार घरे तयार करून पात्र रहिवाशांना हस्तांतरित करण्याचा सरकारची योजना आहे, असे ते म्हणाले. या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी आयोजित केलेल्या एका बैठकीत ते बोलत होते.
हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आणि परवानग्या जलद मिळण्यासाठी 'सिंगल-विंडो' प्रणाली लागू करण्याचे निर्देश फडणवीस यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.