बॉलिवूड अभिनेता राहुल बोस याला एका नामांकित हॉटेलमध्ये २ केळ्याचं ४०० रुपये बिल आकारल्याची घटनाताजी असतानाच मुंबईतील एका हॉटेलमध्ये ग्राहकाला २ उकडलेल्या अंड्यासाठी तब्बल १७०० रुपये मोजावे लागले आहेत. कार्तिक धर असं या ग्राहकचं नाव असून, त्यानं मुंबईतील फोर सीजन्स हॉटेलमध्ये २ उकडलेल्या अंड्याची ऑर्डर दिली होती. त्यावेळी त्याला या अंड्यासाठी तब्बल १ हजार ७०० रुपये द्यावे लागले.
कार्तिक धर यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली असून, त्यांनी उकडलेल्या २ अंड्यांसाठी मला १७०० रुपये द्यावे लागले असं लिहिलं आहे. तसंच, त्यांनी अभिनेता राहुल बोस याला टॅग करत 'भाई आंदोलन करे', असं लिहिलं आहे. कार्तिक धर हे 'ऑल द क्विन मेन' या चित्रपटाचे लेखक आहेत. दरम्यान, याप्रकरणी अद्याप हॉटेल मालकाच कोणतही उत्तर आलेलं नाही. तसंच, आॅम्लेटसाठी देखील त्यांच्याकडून तेवढीच रक्कम आकारण्यात आली.
काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली होती. अभिनेता राहुल बोस यानं एका नामांकित हॉटेलमध्ये २ केळी मागवली होती. त्यावेळी त्याला या २ केळ्यांसाठी ४०० रुपये मोजावे लागले होते. त्यानंतर त्याने सोशल मीडियावरून त्या हॉटेलवर टीका केली होती.
हेही वाचा -
मुंबईत नाही होणार दुधाची कमी- अर्जुन खोतकर
१६ ऑगस्टपर्यंत बंद राहणार पुणे-मुंबई रेल्वे सेवा