१६ ऑगस्टपर्यंत बंद राहणार पुणे-मुंबई रेल्वे सेवा

मुसळधार पावसामुळं मध्य रेल्वेच्या पुणे-मुंबई मार्गावरील घाट परिसरात कोसळलेल्या दरडीमुळं रेल्वे मार्गाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

SHARE

मुसळधार पावसामुळं मध्य रेल्वेच्या पुणे-मुंबई मार्गावरील घाट परिसरात कोसळलेल्या दरडीमुळं रेल्वे मार्गाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या मार्गाची दुरूस्ती करण्यासाठी आणखी आठवडाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं रेल्वेकडून पुणे-मुंबई मार्गावर धावणाऱ्या इंटरसिटी गाड्या १६ आॅगस्टपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागणार आहे.

रेल्वे रूळ पाण्याखाली

मुंबईसह राज्यभरात पडलेल्या मुसळधार पावसामुळं मध्य रेल्वेच्या काही स्थानकादरम्याचे रेल्वे रूळ पाण्याखाली गेले होते. तसंच घाट परिसरात दरड कोसळल्यानं पुणे-मुंबई मार्गावरील रेल्वे सेवा २ आॅगस्टपासून विस्कळीत आहेत्यामुळं डेक्कन क्वीन, इंटरसिटी, सिंहगड व इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या. त्यानंतर रेल्वेकडून दररोज गाड्या रद्द झाल्याचं जाहीर करण्यात येत होतं.

अनेक गाड्या रद्द

दरम्यान, या मार्गाची दुरूस्तीचं काम सुरू असताना शुक्रवारी रेल्वे प्रशासनानं या मार्गावरील गाड्या ११ आॅगस्टपर्यंत धावणार नसल्याचं म्हटलं होतं. परंतु, शनिवारी या तारखांमध्ये पुन्हा बदल करण्यात आला असून, आता या गाड्यांसह प्रगती व डेक्कन एक्सप्रेसही १६ आॅगस्टपर्यंत धावणार नसल्याच स्पष्ट केलं आहे.हेही वाचा -

मुंबईत ईदनिमित्त २ लाख २१ हजार बकरे विक्रीला

चिंतामणीच्या अगमनासाठी भाविकांची मोठी गर्दीसंबंधित विषय
ताज्या बातम्या