Advertisement

चिंतामणीच्या अगमन सोहळ्यात तरुणांची हुल्लडबाजी

दरवर्षी प्रमाणं यंदाही आगमन सोहळ्यात हुल्लडबाजी करणारी तरुणाई पाहायला मिळाली. तसंच, आगमन सोहळ्यात झालेल्या गर्दीमुळं या परिसरातील दुभाजकांवर असलेल्या झाडांचं नुसकान झालं आहे.

चिंतामणीच्या अगमन सोहळ्यात तरुणांची हुल्लडबाजी
SHARES

मुंबईतील नावाजलेल्या मंडळांपैकी एका चिंचपोकळीच्या 'चिंतामणीचा' दिमाखदार आगमन सोहळा रविवार आयोजित करण्यात आला. यंदा या मंडळाचं शतक महोत्सवी वर्ष असून, ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाच आगमन झालं. मुंबईसह अनेक भागांतील भाविकांनी या आगमन सोहळ्यात सहभाग घेतला होता. बाप्पाच आगमन दिमाखात झालं परंतु, दरवर्षी प्रमाणं यंदाही आगमन सोहळ्यात हुल्लडबाजी करणारी तरुणाई पाहायला मिळाली. तसंच, आगमन सोहळ्यात झालेल्या गर्दीमुळं या परिसरातील दुभाजकांवर असलेल्या झाडांचं नुसकान झालं आहे.  

भाविकांची मोठी गर्दी

चिंतामणीच्या आगमनासाठी रविवारी सकाळपासूनच लालबाग-करीरोड परिसरात तरुणाईनं गर्दी केली होती. त्यानंतर दुपारी बाप्पाचा आगमन सोहळा सुरू झाल्यानंतर अनेकांनी लालबाग पूलावर गाड्या थांबवून मुरवणुक पाहण्यासाठी गर्दी केली होती. त्यावेळी जवळपास हजारोंच्या संख्येनं जमलेल्या तरुणाईच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यास मंडळाच्या कार्यकर्त्यांना अपयश आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं बऱ्याच ठिकाणी रेटारेटीही झाली तसंच, परळ ते दादर आणि लालबाग ते भायकाळा परिसरात वाहतूक कोंडी झाली होती

रेल्वे स्थानकात हुल्लडबाजी

त्याशिवाय मध्य रेल्वे मार्गावर चिंचपोकळी आणि करीरोड स्थानकात तरुणांनी हुल्लडबाजी केल्याचं पाहायला मिळालं. त्याचप्रमाणं चिंचपोकळी पूल धोकादायक असतानाही या पूलावर भाविकांची मोठी गर्दी जमलेली होती. दरम्यान, या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात मंडळाला अपयश आलं असली तरी पोलिसांना काही क्षणात या परिसरातील गर्दी कमी केली. भारतमाता परिसरात लालबागच्या दिशेनं येणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी बॅरीगेट्स लावले होते. तसंच, चिंचपोकळी आणि करीरोडच्या पूलावर जमलेली गर्दीही नियंत्रणात आणली.हेही वाचा -

मुंबईत ईदनिमित्त २ लाख २१ हजार बकरे विक्रीलासंबंधित विषय
Advertisement