Advertisement

मुंबईत ईदनिमित्त २ लाख २१ हजार बकरे विक्रीला


मुंबईत ईदनिमित्त २ लाख २१ हजार बकरे विक्रीला
SHARES

मुंबईसह राज्यभरात मुस्लिम बांधवांकडून बकरी ईद साजरी करण्यात येत आहे. बकरी ईदनिमित्त देवनार पशुवधगृहाच्या आवारात भोपाळ, राजस्थान, उत्तर प्रदेश, भिवंडी, रायगड येथून मोठ्या प्रमाणात बकरे आणण्यात आले होते. तसंच, रविवार संध्याकाळपर्यंत २ लाख २१ हजार बकरे, शेळ्या, मेंढ्या, म्हैस, रेडा अशी मोठी जनावरं विक्रीसाठी आले होते. त्यामधील १ लाख ६० हजार जनावरांची विक्री झाली आहे.

५ लाखाचा बकरा

देवनार इथं विक्रीसाठी आलेल्या बकऱ्यांची किंमत लाखात आहे. दहिसर येथून आलेला एका टारझन नावाच्या बकऱ्याची किंमत ५ लाख ११ हजार रुपये असून, हा बकरा मलवा या जातीचा आहे. अफलातून नावाचा बकऱ्याची किंमत ४ लाख ५० हजार रुपये असून, या बकऱ्याला भोपाळ येथून आणण्यात आलं आहे. तसंच, शेरा या आणखी एका बकऱ्याची किंमत १.४० लाख रुपये आहे.

बार कोड प्रवेशिका

यंदा देवनार इथं होणाऱ्या गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी निरीक्षण मनोरे, सीसीटीव्ही कॅमेरे आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. देवनार पशुवधगृहात बकरी ईदनिमित्त भरणाऱ्या बाजारात चोरीचे प्रकार होऊ नयेत म्हणून यावर्षी प्रथमच बार कोड असणाऱ्या प्रवेशिका व्यापाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.हेही वाचा -

बळी निसर्गाचे की सरकारी अनास्थेचे?Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा