Advertisement

मुंबईत दूध पुरवठा सुरळीत- अर्जुन खोतकर

पूरामुळं राज्यातील दुध संकलनावरही मोठा परिणाम झाला आहे. मात्र, शिवसेना नेते आणि राज्याचे दुग्ध विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मुबईसह आजूबाजुच्या परिसरात दुधाचा पुरवठा कमी होऊ देणार नसल्याचं आश्वासन दिलं आहे.

मुंबईत दूध पुरवठा सुरळीत- अर्जुन खोतकर
SHARES

महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर भागात मुसळधार पावासानं निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पूरामुळं राज्यातील दूध संकलनावरही मोठा परिणाम झाला आहे. मात्र, शिवसेना नेते आणि राज्याचे दूग्ध विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मुबईसह आजूबाजुच्या परिसरात दुधाचा पुरवठा कमी होऊ देणार नसल्याचं आश्वासन दिलं आहे.

दुधाची कमतरता

मुंबईत दुधाची कमतरता भासू नये यासाठी राज्याच्या इतर भागातून दूध उपलब्ध केलं जाईल. मुंबईसह अनेक भागांत दररोज ३५ लिटर बंद पिशवी दुधाची विक्री होते. या दुधाचं संकलन पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, पुणे आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्यांतून होतं. यामध्ये मुख्यत: अमुल, गोकुळ, प्रभात, राजहंस, मदर डेअरी, गोवर्धन यांसारख्या दुधाच पुरवठा होत असल्याचं अर्जुन खोतकर यांनी म्हटलं. 

दुधाचा पुरवठा

१० ऑगस्ट रोजी प्रमुख सहकारी आणि खासगी दूध संघांकडून मुंबईला जवळपास ३१.५४ लाख लिटर दूध पुरवठा झाला होता. तर ११ ऑगस्टला ३१.०३ लाख लिटर दुधाचा पुरवठा झाला, असही खोतकर यांनी म्हटलं.



हेही वाचा -

१६ ऑगस्टपर्यंत बंद राहणार पुणे-मुंबई रेल्वे सेवा

भयंकर पूरस्थितीमुळं एसटीच्या उत्पन्नात घट



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा