Advertisement

भयंकर पूरस्थितीमुळं एसटीच्या उत्पन्नात घट

एसटीला दररोजचा ४ ते ५ कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावं लागत असून आतापर्यंत गेल्या १० दिवसात ५० कोटी रूपयाचा महसूल बुडाला आहे.

भयंकर पूरस्थितीमुळं एसटीच्या उत्पन्नात घट
SHARES

मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळं भयंकर पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नद्यांमधील पाणी रस्त्यांवर येत आहे. सखल भागांत पाणी साचल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसंच, या पूरपरिस्थितीचा फटका आता एसटीलाही बसला आहे. एसटीच्या दैनंदिन वाहतूक बहुतांश ठप्प झाली आहे. त्यामुळं एसटीला दररोजचा ४ ते ५ कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावं लागत असून आतापर्यंत गेल्या १० दिवसात ५० कोटी रूपयाचा महसूल बुडाला आहे. अनेक आगार, बसस्थानकं, बसेस पाण्यामध्ये अडकल्यामुळं तेथील स्थावर मालमत्तेचं नुकसान झालं आहे.

२२ कोटी उत्पन्न

बसच्या माध्यमातून एसटीचा दररोज ५५ लाख किलोमीटर इतका प्रवास होतो. त्यातून सरासरी २२ कोटी रुपये उत्पन्न मिळतं. पण गेल्या १० दिवसापासून दररोज एसटीचं किमान १० लाख किलोमीटरच्या बस फेऱ्या रद्द होत आहेत. त्यामुळं उत्पनात घट झाली आहे. तसंच, अनेक भागांत निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळं ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त स्थावर मालमत्तेच्या नुकसानीचा अंदाज वर्तविला जात आहे.

पूराचा फटका 

एसटीचा कोल्हापूर विभागाचा दैनंदिन महसूल ५० लाख आहे. मात्र, गेल्या ४ दिवसापासून या विभागाच्या १२ आगारातून कोणत्याही प्रकारची वाहतूक होऊ शकलेली नाही. त्याशिवाय सांगली, सातारा व कोकणातील काही विभागामध्ये देखील हि परिस्थिती आहे. त्यामुळं आणखी काही दिवस एसटीला याचा फटका बसणार आहे.



हेही वाचा -

मुंबईत ईदनिमित्त २ लाख २१ हजार बकरे विक्रीला

चिंतामणीच्या अगमनासाठी भाविकांची मोठी गर्दी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा