IKEA चं मुंबईतील पहिलं स्टोअर 'इथं' होणार लाँच,

File image
File image
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

स्वीडिश होम फर्निशिंग किरकोळ विक्रेता IKEA नं मंगळवारी सांगितलं की, ते मुंबईतील पहिले सिटी स्टोअर लवकरच उघडणार आहेत. जे शहरातील ग्राहकांना अधिक सुलभ असेल.

गेल्या वर्षी नवी मुंबईत मोठ्या स्वरुपाचे स्टोअर उघडल्यानंतर, IKEA आता मुंबईच्या वरळी इथल्या कमला मिल्समध्ये छोटं स्टोअर उघडत आहे, असं त्यांनी जाहीर केलं आहे.

भारतीय बाजारातील संभाव्यतेवर त्याचा दृढ विश्वास आहे आणि पुढील वर्षी आणखी स्टोअर उघडण्याची शक्यता आहे, असं IKEAकडून सांगितलं गेलं.

"वरळीतील स्टोअर ८० हजार चौरस फूट असेल आणि २०२१ च्या अखेरीस उघडेल, जे सर्व सुरक्षित खरेदी उपायांसह सज्ज असेल," असं म्हटलं आहे.

आयकेईए इंडिया मार्केट आणि विस्तार व्यवस्थापक प्रति हॉर्नेल म्हणाले की, मुंबई आमच्या सर्वात महत्वाच्या बाजारपेठांपैकी एक आहे.

ते म्हणाले, "वरळीतील आमच्या पहिल्या IKEA इंडिया सिटी स्टोअरसह, आम्ही मुंबईतील आणखी बऱ्याच लोकांना सुंदर, परवडणारे आणि शाश्वत घरगुती फर्निचरिंग उपलब्ध करून देऊ."

हे स्टोअर IKEA भारतात उघडणारे तिसरे भौतिक स्टोअर असेल. IKEA ने आपले पहिले स्टोअर हैदराबादमध्ये २०१९ मध्ये उघडले होते. त्यानंतर त्याचे नवी मुंबई डिसेंबर २०२० मध्ये आणि तिसरे मोठे IKEA स्टोअर पुढील वर्षी बेंगळुरूमध्ये उघडण्याची अपेक्षा आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला, त्यानं आयकिया शॉपिंग अॅप लाँच केलं आणि अनेक शहरांमध्ये त्याचा विस्तार केला.


हेही वाचा

पीएफ खात्याशी आधार ३१ ऑगस्टपर्यंत करा लिंक, अन्यथा पडेल भुर्दंड

५० हजारांपेक्षा जास्त चेकसाठी द्यावे लागणार तपशील

पुढील बातमी
इतर बातम्या