Advertisement

५० हजारांपेक्षा जास्त चेकसाठी द्यावे लागणार तपशील

रिझर्व्ह बँकेने ऑगस्ट 2020 मध्ये चेक ट्रान्झॅक्शन सिस्टम साठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम जाहीर केली होती.

५० हजारांपेक्षा जास्त चेकसाठी द्यावे लागणार तपशील
SHARES

आता 50 हजार रुपयांवरील चेक (धनादेश) साठी तुमचा तपशील द्यावा लागणार आहे.  तपशील दिला नाहीतर बँक तुमचा चेक रिजेक्ट करु शकते. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार बँकांनी पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू करण्यास सुरुवात केली आहे. बहुतांश बँका 1 सप्टेंबरपासून याची अंमलबजावणी करणार आहेत. 

रिझर्व्ह बँकेने ऑगस्ट 2020 मध्ये चेक ट्रान्झॅक्शन सिस्टम साठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम जाहीर केली होती. या अंतर्गत तुम्ही जारी केलेला चेक तुमचाच आहे की नाही हे तपासता येणार आहे. यामध्ये चेक जारी करण्याची तारीख, 6 अंकी चेक क्रमांक, रक्कम, लाभार्थ्यांचे नाव इत्यादींचा समावेश आहे. बँक शाखेला भेट देऊन किंवा इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगद्वारे याची माहिती दिली जाऊ शकते. काही बँका ग्राहकांना एसएमएस, एटीएम किंवा ईमेलद्वारे माहिती देण्याची सुविधाही देत आहेत.

आरबीआयने गेल्या वर्षी याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जारी केले होते. बँक आपल्या खातेधारकांच्या इच्छेनुसार 50 हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कमेवरील चेकसाठी या सुविधा लागू करु शकतात. मात्र 5 लाखांपेक्षा जास्त रकमेच्या चेकसाठी बँका अनिवार्य करू शकतील. 

इंटरनेट बँकिंगद्वारे चेकचे व्हेरिफिकेशन करता येणार असून यासाठी ग्राहकाला नेट बँकिंगवर लॉगिन करावे लागेल. यानंतर सर्व्हिसेसची निवड केल्यानंतर चेक सर्व्हिसेसमध्ये जाऊन पॉझिटिव्ह पेला निवडावे लागेल. ज्या नावाचा धनादेश देण्यात आला आहे, त्याचा तपशील तुम्हाला टाकावा लागेल. पॉझिटिव्ह पे सिस्टीमद्वारे तुम्ही पेमेंटसाठी मर्यादादेखील सेट करू शकता.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा