Advertisement

पीएफ खात्याशी आधार ३१ ऑगस्टपर्यंत करा लिंक, अन्यथा पडेल भुर्दंड

जर ईपीएफ खात्याला आधारशी लिंक केले नाहीतर खात्यात पैसे येणार नाहीत. ईपीएफ खात्यातील पैसे काढताना देखील अडचणी निर्माण होऊ शकतात.

पीएफ खात्याशी आधार ३१ ऑगस्टपर्यंत करा लिंक, अन्यथा पडेल भुर्दंड
SHARES

ईपीएफ खात्याला आधारशी लिंक करणे अनिवार्य करण्यात आलं आहे. ईपीएफ आधारशी लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्टपर्यंत आहे. जर ईपीएफ खात्याला आधारशी लिंक केले नाहीतर खात्यात पैसे येणार नाहीत. ईपीएफ खात्यातील पैसे काढताना देखील अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे ३१ ऑगस्टपूर्वी आपल्या ईपीएफ खात्याला आधार लिंक करणे गरजेचे आहे. 

आधारकार्ड लिंक न केल्यामुळं खातेधारकांना इलेक्ट्रॉनिक चलन रिटर्न ही सुविधा वापरता येणार नाही. ज्यांचं ईपीएफ खाते आधारशी लिंक नाही त्यांना युएएन क्रमांक आधार कार्ड पडताळणी करता येणार नाही. यामुळे खातेधारकांच्या खात्यात पैसे देखील जमा होणार नाहीत. 

अशी आहे लिंक करण्याची प्रक्रिया

- सर्वात आधी EPFO पोर्टल epfindia.gov.in वर जा.

- UAN आणि पासवर्ड वापरुन आपल्या खात्याला लॉग इन करा.

- Manage विभागात KYC पर्यायावर क्लिक करा.

- यानंतर उघडलेल्या पेजवर आपण आपल्या EPF खात्याशी जोडलेले अनेक कागदपत्रे पाहू शकता.

- यानंतर आधारचा पर्याय निवडा आणि आधार कार्डवर असलेले तुमचे नाव टाईप करून save वर क्लिक करा.

- तुम्ही दिलेली माहिती सुरक्षित होईल. तुमचे आधार UIDAI च्या डेटासोबत व्हेरिफाईड केले जाईल.

- तुमचे KYC दस्तऐवज बरोबर असल्यास तुमचे आधार कार्ड लिंक होऊन जाईल. त्यानंतर तुमच्या आधार तपशीलांसमोर “Verify” लिहून येईल.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा