केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारने दिली 'ही' दिवाळी भेट

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांना दिवाळीच्या आधीच मोठी भेट दिली आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या निर्णयाची माहिती दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्तावाढीला मंजुरी दिली आहे. 

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आता १७ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. याआधी महागाई भत्ता १२ टक्के होता. वाढीव भत्ता १ जुलै २०१९ पासून लागू होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ५० लाख कर्मचारी आणि ६२ लाख  निवृत्त वेतनधारकांना फायदा होणार आहे. सहसा महागाई भत्त्यात २ ते ३ वाढ होते. मात्र, यावेळी सरकारने ५ टक्के वाढ केली आहे. 

महागाई भत्त्यात वाढ केल्यामुळे सरकारी तिजोरीवर १६ हजार कोटी रुपयांचा अधिक बोजा पडणार आहे. आशा स्वयंसेविकांचा पगार १ हजार रुपयांवरून २ हजार रुपया केला असल्याचंही  प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. याचबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम किसान योजना आधारला लिकं करण्याची मुदत ३१ नोव्हेंबर २०१९ पर्यंत वाढवली आहे.


हेही वाचा -

SBI चं कर्ज झालं स्वस्त, पण ठेवींवरील दरही घटले

बीएसएनएल, एमटीएनएलला लागणार टाळं?


पुढील बातमी
इतर बातम्या