रस्त्यांवरील खड्डे भरणं बेकायदेशीर- महापालिका

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतल्या रस्त्यांवरील खड्डे आता त्रासदायक ठरत आहेत. या खड्ड्यांमुळं होणार अपघात आणि पादचाऱ्यांची होणारी गैर सोय लक्षात घेता स्थानिकच खड्डे भरत आहेत. मात्र, असे खड्डे भरणं बेकायदेशीर असल्यानं खड्डे न भरण्याचं आवाहनं केलं आहे. रस्त्यांवरील हे खड्डे धोकादायक असल्यानं रहिवाशांनी अनेकदा या खड्ड्यांबाबत महापालिकेकडं तक्रार दाखल केली आहे. मात्र पालिकेनं या तक्रारीची दखल न घेतल्यानं स्थानिक खड्डे भरत आहेत.

ट्विटरवरून माहिती 

महापालिकेनं यासंदर्भात आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून माहिती दिली आहे. 'प्रिय मुंबईकर खड्डे भरण्यासाठी सतत @mybmc संपर्कात राहा. हा कायदेशीर आणि योग्य मार्ग आहे. कोणताही खड्डा भरण्यास टाळा. खड्डे भरण्यासाठी चुकीची पद्धत वापरल्यानं अपघात होऊ शकतात. त्यामुळं असं करणं बेकायदेशीर असून, कृपया कायदा हातात घेऊ नका' असं आवाहनं पालिकेनं केलं आहे.

अनेकांनी गमावले जीव

मुंबईतील काही रहिवाशांनी या खड्ड्यांमुळं आपला जीव गमवावा लागला आहे. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी स्वत: रस्त्यावर उतरून खड्डे भरले आहेत. त्याशिवाय, काही एनजीओनं ही खड्डे भरण्यास सुरूवात केली आहे. 


हेही वाचा -

गणेशोत्सव २०१९: एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला, पगार होणार लवकर

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मंगळवारी लागणार निकाल


पुढील बातमी
इतर बातम्या