फक्त 'हे' प्रवासी RT-PCR शिवाय प्रवास करू शकतात - राजेश टोपे

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

बुधवार, १ डिसेंबर रोजी, महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री, राजेश टोपे यांनी नमूद केलं की, राज्य सरकारने एक अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये संपूर्ण लसीकरण केलेले स्थानिक प्रवासी RT-PCR चाचणीशिवाय प्रवास करू शकतात. एएनआय या वृत्तसंस्थेनं अशी बातमी दिली आहे.

तथापि, जर प्रवाशाच्या गेल्या १०-१५ दिवसांच्या प्रवासाच्या इतिहासात ओमिक्रॉन बाधित प्रदेशांच्या भेटीचं वर्णन केलं असेल, तर त्यांना एक आठवडा क्वारंटाईन केलं जाईल. त्या एक आठवड्यात त्यांची दर ४८ तासांनी RT-PCR चाचणी केली जाईल. त्यांच्या नकारात्मक RT-PCR अहवालानंतरच जाऊ शकतात.

महाराष्ट्र सरकारनं एक अधिसूचना जारी केली आहे की, पूर्ण लसीकरण केलेले स्थानिक प्रवासी RT-PCR सह प्रवास करू शकतात. प्रवाशांच्या प्रवासाच्या १०-१५ दिवसांच्या इतिहासात #Omicron बाधित क्षेत्रे दिसत असल्यास, ते ७ दिवसांच्या विलगीकरणानंतर नकारात्मक RT-PCR अहवाल असेल तरच घरी जाऊ शकतात, असं राजेश टोपे म्हणाले.

या व्यतिरिक्त, महाराष्ट्र सरकारनं एक अधिसूचना जारी केली आहे की, जोखीम असलेल्या देशांतील आंतरराष्ट्रीय प्रवाशांना प्राधान्यानं खाली उतरवले जाऊ शकते. त्यांच्या पडताळणीसाठी MIAL आणि विमानतळ प्राधिकरणाद्वारे वेगवेगळे काउंटर तयार केले जातील.

याशिवाय, त्यांना ७ दिवस संस्थात्मक विलगीकरणात ठेवलं जाणं देखील आवश्यक आहे. त्यांच्यासाठी RT-PCR चाचण्या दुसऱ्या, चौथ्या आणि सातव्या दिवशी घेतल्या जातील. त्यांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्यास त्यांना रुग्णालयात हलवण्यात येईल. त्यांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्यास त्यांना सात दिवस होम क्वारंटाईन राहावं लागेल.

राज्य सरकारनं काढलेल्या या अधिसूचनेच्या प्रकाशात बुधवारी केंद्रीय आरोग्य सचिवांनी महाराष्ट्राच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र लिहिले की, “मुंबई विमानतळावर आंतरराष्ट्रीय आगमनासाठी राज्यानं जारी केलेले आदेश आरोग्य मंत्रालयानं घोषित केलेल्या निकषांशी जुळवावेत”.


हेही वाचा

आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर

दिलासादायक! मुंबईत ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नाही

पुढील बातमी
इतर बातम्या