Advertisement

आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर

नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सुधारीत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. ज्या गाईडलाईन्सची अमलबजावणी आजपासून केली जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर
SHARES

१५ डिसेंबरपासून नियमित आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयानं एक आदेश जारी करून ही घोषणा केली आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या निर्णयाला स्थगिती दिली गेली आहे.

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे केंद्र सरकारनं खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. चारच दिवसापूर्वी म्हणजे २६ नोव्हेंबरला भारत सरकारनं १४ देश वगळता इतर सर्व देशांसाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यास परवानगी दिली होती.

कोरोना महासाथ ओसरत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला असल्याचं म्हटलं गेलं होतं. आता हा निर्णय परत मागे घेण्यात आला आहे.

भारतात कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर मार्च २०२० पासून आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर निर्बंध लागू करण्यात आले होते. काही महिने आंतरराष्ट्रीय विमानसेवा ठप्प होती. त्यानंतर 'वंदे भारत' विमान सेवा आणि कोव्हिड बबल नियमांनुसार, विमानसेवा सुरू करण्यात आली.

भारत सरकारनंही कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सुधारीत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. ज्या गाईडलाईन्सची अमलबजावणी आजपासून केली जाणार आहे.

  • संसर्गाचा धोका असणाऱ्या देशातून आलेल्या आणि लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाही विमानतळावर कोरोना टेस्ट करणं अनिर्वाय असणार आहे.
  • दक्षिण आफ्रिकेत अडकलेल्या भारतीय नागरिकांना ज्यांना या व्हेरियंटची लागण झाली आहे त्यांना त्यांच्या स्थानिक वाणिज्य दूतावासांशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.
  • रिझल्ट येइपर्यंत प्रवाशांना विमानतळावर थांबावे लागणार आहे. ७ दिवसाचं क्वारंटाईन करण्यात येईल.
  • 'जोखमीचे' देश वगळता इतर देशांतील प्रवाशांना विमानतळाबाहेर जाण्याची परवानगी असेल. त्यांना १४ दिवस सेल्फ मॉनिटरिंग करावे लागेल.
  • सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना हवाई सुविधा पोर्टलवर उपलब्ध असलेल्या सेल्फ-डिक्लेरेशन फॉर्ममध्ये फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी १४ दिवसांचा प्रवास इतिहास द्यावा लागेल.हेही वाचा

१ डिसेंबरपासून हार्बर मार्गावर १२ एसी लोकल धावणार, पहा नवे वेळापत्रक

बेस्ट प्रशासनाच्या 'त्या' निर्णयाची अद्याप अंमलबजावणी नाहीच

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा