Advertisement

बेस्ट प्रशासनाच्या 'त्या' निर्णयाची अद्याप अंमलबजावणी नाहीच

बेस्ट प्रवाशांचे हाल टळले. मात्र, या आदेशाची पूर्तता करण्याची वेळ येताच प्रचंड गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

बेस्ट प्रशासनाच्या 'त्या' निर्णयाची अद्याप अंमलबजावणी नाहीच
SHARES

ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं आपली आरोग्य यंत्रणा पुन्हा सुसज्ज करण्यास सुरूवात केली आहे. मात्र या ओमायक्रॉन संसर्गामुळं मुंबईसह राज्यभरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच बेस्ट प्रशासनाही या संसर्गाची धास्ती घेतली असल्याचं पाहायला मिळतं आहे. या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता कोरोना प्रतिबंधक लशीच्या २ मात्रा घेतलेल्या प्रवाशांनाच बसमधून प्रवास करण्यास अनुमती देण्याच्या आदेशाची बेस्ट उपक्रमानं काढला. या आदेशाची मंगळवारपासून अंमलबजावणी केली जाणार होती. परंतू, अद्याप काही केलेली नाही. 

परिणामी, बेस्ट प्रवाशांचे हाल टळले. मात्र, या आदेशाची पूर्तता करण्याची वेळ येताच प्रचंड गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. बेस्ट उपक्रमानं राज्य सरकारच्या निर्देशानुसार बेस्ट प्रवाशांसाठी २ लसमात्रांचं बंधन ठेवलं आहे. त्यानुसार बेस्टमध्ये प्रवेश करण्यापूर्वी बेस्टच्या थांब्यांवर वाहक आणि अन्य काही कामगारांच्या साह्यानं प्रवाशांनी २ मात्रा घेतल्याचे पुरावे तपासले जाणार आहेत.

त्यासाठी युनिव्हर्सल पास वा अन्य पुरावे पाहिले जातील. या निर्णयामुळं बेस्ट प्रवाशांसह कामगारांमध्येही नाराजी पसरली आहे. बेस्ट कामगार आणि प्रवासी संख्येची तुलना केल्यास हा नियम अंमलात आणणे कठीण असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. 

मंगळवारपासून हा आदेश अंमलात येणार असल्याचे बेस्टतर्फे सांगण्यात आले होते. परंतु बेस्टच्या अनेक आगारांमध्ये या आदेशाची प्रत कोणत्याही नोटीस बोर्डवर दिसली नव्हती. त्यामळे मंगळवारी तरी प्रवासी आणि बेस्ट कामगारांचा त्रास टळल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. बेस्टचा हा आदेश विचित्र असून त्याची नेमकी केव्हापासून अंमलबजावणी होते हे पाहणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा