महाराष्ट्रात २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन कायम

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्य सरकारने पुन्हा एकदा २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. या लॉकडाऊनमध्ये आतापर्यंत परवानगी देण्यात आलेल्या सेवा आणि गोष्टी सुरू राहणार असून ज्या सेवांना परवानगी देण्यात आलेली नाही. त्या पूर्वीप्रमाणेच बंद राहतील.

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचे तीन प्रकार समोर आले होते. राज्यातही नव्या विषाणूचे रुग्ण आढळून आलेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने 31 जानेवारी 2021 पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. 

मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील दुकाने व आस्थापना रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील तसेच उपहारगृहे रात्री १ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील. दुकानांसाठी कमाल कर्मचाऱ्यांची ३० टक्के उपस्थितीची अट तसेच उपहारगृहे, फूड कोर्ट यासाठी वेळोवेळी निर्गमित एसओपीप्रमाणे अंमलबजावणी राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

या सूचना बंधनकारक

- सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक

- सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक

- साबणाने सतत हात धुणे आवश्यक


हेही वाचा -

मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस १४ फेब्रुवारीपासून प्रवाशांच्या सेवेत

महाराष्ट्र - कोरोना लसीकरण मोहिमेत सहभागी होणाऱ्यांच्या संख्येत वाढ


पुढील बातमी
इतर बातम्या