Advertisement

महाराष्ट्र - कोरोना लसीकरण मोहिमेत सहभागी होणाऱ्यांच्या संख्येत वाढ

महाराष्ट्रात covid 19 च्या लसीकरण मोहिमेत सहभागी होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

महाराष्ट्र - कोरोना लसीकरण मोहिमेत सहभागी होणाऱ्यांच्या संख्येत वाढ
SHARES

महाराष्ट्रात covid 19 च्या लसीकरण मोहिमेत सहभागी होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. जवळपास १५ टक्क्यांची वाढ पाहायला मिळत आहे. लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यातील सातव्या दिवशी आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या ४१ हजार ४७० आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे.

अहवालानुसार राज्य हे ५३ हजार ९०० कामगारांच्या दैनंदिन उद्दिष्टाच्या केवळ ७७ टक्के काम करू शकते. राष्ट्रीय आरोग्य मिशनचे प्रमुख एन रामास्वामी यांनी सांगितलं की, “आम्ही बर्‍याच साइट जोडल्या, त्यातील फरक इथं असणं बंधनकारक होतं.”

दरम्यान, यापूर्वी १२ जानेवारीला सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय)कडून 'कोविशिल्ड' या लसचे ९.६३ लाख डोस महाराष्ट्राला मिळाले. नॅशनल कोल्ड चेन सेंटर, पुणे हे महाराष्ट्राचे केंद्रबिंदू आहे. जिथे राज्य आरोग्य विभागामार्फत लसींची साठवण केली जाते आणि नंतर वेगवेगळ्या जिल्ह्यात आणि महानगरपालिकांना वाटप केली जाते.

मात्र, केंद्रानं आवश्यक डोसपैकी केवळ ५५ टक्के डोस राज्याला दिला आहे, असा आरोप राजेश टोपे यांनी केला. महाराष्ट्रात बफर स्टॉकसह एकूण १७ लाख डोस आवश्यक आहेत. असं असूनही, केंद्र सरकारनं केवळ पहिल्या टप्प्यात ९.६३ लाख डोस दिले आहेत.

दुसरीकडे, बुधवारी मुंबईत कोरोनाव्हायरसचे ४३२ नवीन रुग्ण आढळले. ४९९ रुग्ण बरे झाले आहेत. तर ६ जमांचामृत्यू झाला आहे. आतापर्यंत २ लाख ८९ हजार ३०० रुग्ण बरे झाले आहेत. शहरात मृतांचा आकडा ११ हजार ३१९ च्या घरात गेला आहे.



हेही वाचा

शून्य कोविड -१९ रुग्ण नोंदवल्यानंतर दादरमध्ये आढळली कोविडचे ४ नवीन रुग्ण

Covid 19च्या रुग्णांमध्ये घट होतेय, पण शस्त्रक्रिया अद्याप टांगणीवरच

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा