Advertisement

शून्य कोविड -१९ रुग्ण नोंदवल्यानंतर दादरमध्ये आढळली कोविडचे ४ नवीन रुग्ण

मंगळवारी, दादरमध्ये ४ नवीन कोविड -१९ चे रुग्ण सापडले. आता दादरमध्ये कोविड रुग्णांची संख्या तब्बल ४ हजार ९१२ पर्यंत नोंदवली गेली.

शून्य कोविड -१९ रुग्ण नोंदवल्यानंतर दादरमध्ये आढळली कोविडचे ४ नवीन रुग्ण
SHARES

मंगळवारी, दादरमध्ये ४ नवीन कोविड -१९ चे रुग्ण सापडले. आता दादरमध्ये कोविड रुग्णांची संख्या तब्बल ४ हजार ९१२ पर्यंत नोंदवली गेली. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)च्या म्हणण्यानुसार, एकूण ६ हजार ६५३ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत आणि त्यांना सोडण्यात आलं आहे.

सध्या दादरमध्ये ८६ सक्रिय कोविड -१९ रुग्ण आहेत. दुसरीकडे, माहीममध्ये ५ नवीन कोविड -१९ रुग्ण आढळली. त्यामुळे त्यांची संख्या ४ हजार ७५५ पर्यंत गेली आहे. तर ४ हजार ४९२ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सद्यस्थितीत माहिम भागात ११९ रुग्णांना वेगळं ठेवण्यात आलं आहे.

दरम्यान, दिलासादायक म्हणजे मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी वसाहत धारावीत सध्या कोविडच्या एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. तर एकूण ३ हजार ५८३ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. सध्या धारावीत केवळ १६ सक्रिय कोविड -१९ रुग्ण आहेत.

यापूर्वी, शुक्रवार, २२ जानेवारी रोजी दादर आणि धारावीमध्ये शून्य कोविड -१९ रुग्ण नोंदवली गेली. धारावीसाठी २५ डिसेंबर २०२० पासूनच्या साथीच्या आजारातील ही दुसरी घटना आहे. जी-उत्तर वॉर्ड, ज्यामध्ये धारावी, माहीम आणि दादर यांचा समावेश आहे. २४ प्रशासकीय प्रभागांपैकी महापालिकेच्या हद्दीतील दुसर्‍या क्रमांकाचा प्रभाग आहे.

मंगळवार, २७ जानेवारी रोजी मुंबईत ३४२ कोविड रुग्ण आढळली. ७७८ रुग्ण बरे झाले तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)च्या आकडेवारीनुसार आतापर्यंत ५ हजार ७१६ सक्रिय रूग्ण आहेत आणि २ लाख ८८ हजार ०११ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. शहरात मृतांचा आकडा ११ हजार ३१३ आहे.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा