Advertisement

मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस १४ फेब्रुवारीपासून प्रवाशांच्या सेवेत

अहमदाबाद ते मुंबई ते अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस पुन्हा १४ फेब्रुवारीपासून सेवेत येणार आहे.

मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस १४ फेब्रुवारीपासून प्रवाशांच्या सेवेत
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली व प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे तात्पुरती रद्द केलेली अहमदाबाद ते मुंबई ते अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस पुन्हा १४ फेब्रुवारीपासून सेवेत येणार आहे. ही गाडी आठवड्यातून ४ दिवस धावणार आहे.

लॉकडाऊनमध्ये लांब पल्ल्याच्या गाड्याही बंद ठेवण्यात आल्या होत्या. सुरुवातीला फक्त श्रमिकांसाठी आणि त्यानंतर विशेष गाड्यांची सेवा सुरू झाली. लॉकडाऊन शिथिल होताच गेल्या १७ ऑक्टोबरपासून अहमदाबाद ते मुंबई ते अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसही चालवण्यात आली. गुरुवार वगळता ही गाडी उर्वरित ६ दिवस प्रवाशांच्या सेवेत होती.

अंधेरी स्थानकातही थांबा देण्यात आला होता. मात्र सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेऊनही तेजस एक्स्प्रेसची दररोज २५ ते ४० टक्केच तिकिटे आरक्षित होत होती. आयआरसीटीसीला मोठा तोटाही सहन करावा लागत होता. त्यामुळे २४ नोव्हेंबर २०२० पासून ही एक्स्प्रेस तात्पुरती रद्द करण्यात आली होती. कोरोनाचे संक्रमण कमी झाले असून मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे इंडियन रेल्वे कॅटरिंग टूरिझम कॉपरेरेशनने (आयआरसीटीसी) तेजस एक्स्प्रेस १४ फेब्रुवारीपासून पुन्हा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

गाडी क्रमांक ८२९०१ आणि ८२९०२ तेजस एक्स्प्रेस शुक्र वार, शनिवार, रविवार, सोमवार धावणार आहे. त्याचे आरक्षण सुरू करण्यात आल्याची माहिती आयआरसीटीसीने दिली आहे. मुंबई व अहमदाबाद दरम्यान नदियाड, वडोदरा, भरुच, सुरत, वापी, बोरीवली, अंधेरी स्थानकात या गाडीला थांबा आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा