बाप्पा पावला! सिद्धिविनायक मंदिरातील कर्मचारी होणार 'परमनंट'

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • सिविक

प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बाप्पा प्रसन्न झाला अाहे. सिद्धिविनायक मंदिरात १० ते १५ वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात अाला होता. सोमवारी यासंदर्भातला शासननिर्णय जारी करण्यात अाला. 

अनेक कर्मचारी १० ते १५ वर्षांपासून सिद्धिविनायक मंदिरात रोजंदारीवर, अस्थायी स्वरूपात काम करत होते. त्यांची पदं तयार करण्यात अाली. या संदर्भात सर्व विश्वस्तांनी प्रचंड मेहनत घेऊन पूर्ण अभ्यासानिशी अाकृतीबंध तयार केला. हा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला. तो मंजूर झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी होण्याचा मार्ग मोकळा झाला.

- अादेश बांदेकर, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष

व्याजातून फेडणार रक्कम

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे जवळपास २५ ते २६ कोटी रुपये अाम्ही एका राष्ट्रीयकृत बँकेत फिक्स डिपाॅझिटमध्ये जमा केले होते. त्यातून येणाऱ्या व्याजाच्या रकमेतून अाम्ही निधी संकलित केला असून त्याद्वारेच हा अार्थिक भार उचलणार अाहोत. म्हणजेच न्यास अाणि शासकीय तिजोरीवर त्याची भार पडणार नाही. भविष्यात या १३३ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना त्याचा लाभ होणार अाहे, असंही अादेश बांदेकर यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितलं. अादेश बांदेकर यांना काही दिवसांपूर्वीच राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात अाला अाहे.


हेही वाचा-

'होम मिनिस्टर' होणार खरेखुरे 'मिनिस्टर'

निवडणूक फंडासाठी प्लास्टिक धोरण, राज यांचा आरोप


पुढील बातमी
इतर बातम्या