एमएमआर क्षेत्रातील शिक्षकांची ५० टक्के उपस्थितीची अट रद्द

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

एमएमआर ( मुंबई, ठाणे, रायगड व पालघर) क्षेत्रातील  शिक्षक (teacher) आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थितीची अट आता रद्द करण्यात आली आहे. त्यांना वर्क फ्रॉम होमची सवलत मिळाली आहे. त्यामुळे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शाळांमध्ये शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ५० टक्के उपस्थितीची अट ठेवण्यात आली होती. मात्र, त्यांना लोकल प्रवासास परवानगी मिळत नव्हती. त्यामुळे त्यांचे प्रचंड हाल होत होते. शिक्षकांना लोकलप्रवासाची मुभा द्या किंवा ५० टक्के उपस्थितीची अट शिथिल करा अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होत होती. अखेर ही अट करून आता त्यांना वर्क फ्रॉम होमची सवलत मिळाली आहे.

यासंदर्भातील आदेश राज्याचे शिक्षण संचालक व मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक यांनी शिक्षण निरीक्षक व शिक्षणाधिकाऱ्यांना काढले आहेत. त्यानुसार ५० टक्के उपस्थितीची अट वगळली असून शिक्षकांना वर्क फ्रॉम होम करून ऑनलाईन शिक्षण देण्याच्या सूचना केल्या आहेत.

विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मुंबईतील शाळांमधील ठाणे, पालघर, नवी मुंबई व रायगड जिल्ह्यात राहणाऱ्या शिक्षकांनी खाजगी गाड्यांनी प्रवास केला. ठाणे पालघर व नवी मुंबईतील शाळांमधील शिक्षकांना लोकल प्रवासाशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे येथील शिक्षकही स्वखर्चाने खासगी गाड्यांनी प्रवास करत आहेत. त्याचा मोठा आर्थिक भार शिक्षकांना पडत आहे.  त्यामुळे शिक्षकांना ऑनलाईन अध्यापनासाठी वर्क फ्रॉम होम करू देण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनीही केली होती.

तसंच ज्या शाळांची १० वी मूल्यमापनाची कामे राहिली असतील अशा शाळांमधील शिक्षक- शिक्षकेतरांना युनिव्हर्सल कार्डच्या किचकट प्रक्रियेपेक्षा १० वीची कामे होईपर्यंत शाळेच्या ओळखपत्रावरच तिकीट द्यावे अशी मागणी आज अनिल बोरनारे यांनी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.



हेही वाचा -

महापालिकेच्या शाळांमध्येही डिजिटल वर्ग सुरू होणार

२६/११ हिरो तुकाराम ओंबळे यांचा अनोखा सन्मान, नव्या कोळी प्रजातीला दिले नाव

पुढील बातमी
इतर बातम्या