Advertisement

महापालिकेच्या शाळांमध्येही डिजिटल वर्ग सुरू होणार

साध्याच जग हे डिजिटल स्वरूपाच असून व्यवहार, शिक्षण व अनेक महत्वाच्या अधिकृत बैठका या ऑनलाईनच्या माध्यमातून होत आहेत.

महापालिकेच्या शाळांमध्येही डिजिटल वर्ग सुरू होणार
SHARES

साध्याच जग हे डिजिटल स्वरूपाच असून व्यवहार, शिक्षण व अनेक महत्वाच्या अधिकृत बैठका या ऑनलाईनच्या माध्यमातून होत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता महापालिकेनं ही शिक्षणाच्या बाबतीत डिजिटल क्षेत्रात पदार्पण केलं असून, महापालिका (bmc) आपल्या शाळांमधील १३०० वर्ग खोल्यांमध्ये इयत्ता पहिली ते दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘डिजिटल वर्ग’ सुरू करणार आहे. त्यामुळे आता महापालिकेतील लाखो विद्यार्थी हे नामांकित खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांप्रमाणेच आधुनिक शिक्षण घेऊ शकणार आहेत.

या संगणकाच्या युगात त्यांचा शैक्षणिक व बौध्दिक विकास अधिक चांगल्या पद्धतीनं होऊन त्यांना पुढे सरकारी, खासगी नोकरी, उद्योग, व्यवसाय करणे अधिक सुकर होणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थापत्य समिती (उपनगरे)च्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

महापालिकेच्या शाळांमध्ये आधुनिक पद्धतीच्या शिक्षणाचे धडे देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख व आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवानेते व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे जास्त आग्रही राहिले असून ते सतत पाठपुरावा करीत होते. त्यामुळेच पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाचे दरवाजे काही वर्षांपूर्वी ‘व्हर्च्युअल क्लासरूम’ च्या यशस्वी संकल्पनेतून उघडले गेले. तसेच पालिकेच्या विद्यार्थ्यांना संगणकीय युगात बसल्या जागी ‘टॅब’ द्वारे शिक्षण घेण्यासाठीही दालन उघडण्यात आले.

या संदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात आलेला असून त्यामध्ये महापालिकेच्या १३०० वर्गात कार्यादेश मिळाल्यापासून पुढील ६ महिन्यात ‘डिजिटल वर्ग’ तयार करून त्यांचा पुरवठा करणे, त्यामध्ये इंटरॅक्टिव पॅनल (एलईडी), यूपीएस व इ- लर्निंग आणि मल्टीमिडिया कंटेंट (इयत्ता १ ली ते १० वी पर्यंत), उभारणी, चाचणी व कार्यान्वित करणे आदी कामांसाठी कंत्राटदार मे.बेनेट कोलमन अँड कंपनी लि.याला ३६ कोटी ७९ लाख रुपये देण्यात येणार आहेत.

वर्गातील विद्यार्थ्यांना खास अभ्यासक्रम देण्यात येणार असून त्यामध्ये कोडी, अँनिमेशन, गेम्स आदी माध्यमांतून शिक्षण देण्यात येणार आहे. तसेच, व्हाईट बोर्ड, स्मार्ट बोर्ड, स्पिकर्स या यंत्रणांच्या सहाय्याने हे शिक्षण आत्मसात करता येणार आहे. पालिकेच्या शाळेतील शिक्षकांना या डिजिटल वर्गाबाबत व शिक्षण याबाबत ६  महिन्यांचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

महापालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी, हे डिजिटल शिक्षण विद्यार्थ्यांना शिक्षकांमार्फत शाळेतील वर्गातच दिले जाणार असून त्यासाठी इंटरॅक्टिव पॅनल ( एलईडी)चा वापर करण्यात येणार असल्याचे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. तसेच, या पॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात येणारे शैक्षणिक धडे हे चांगलेच स्मरणात राहणार असून त्यांचे पुनर्भरण होणार आहे. त्याचप्रमाणे, या पॅनलचा वापर करून विद्यार्थ्यांची परीक्षाही घेता येणार आहे.



हेही वाचा -

  1. पॅन कार्ड हरवलंय, खराब झालंय? असं मिळवा नवीन पॅन कार्ड

  2. रिलायन्सनं गुगलसोबत मिळून लॉन्च केला जियोफोन नेक्स्ट, १० सप्टेंबरपासून होणार विक्री
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा