Advertisement

पॅन कार्ड हरवलंय, खराब झालंय? असं मिळवा नवीन पॅन कार्ड

पॅनकार्ड हे फार महत्त्वाचं कागदपत्र आहे. बऱ्याचदा पॅनकार्ड हरवतं किंवा खराब होतं. अशावेळी मग अनेक अडचणी येतात. मात्र, आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.

पॅन कार्ड हरवलंय, खराब झालंय? असं मिळवा नवीन पॅन कार्ड
SHARES

पॅन कार्ड (pan card) हे फार महत्त्वाचं कागदपत्र आहे. बँक खाते (bank account) उघडणं, नवीन क्रेडिट कार्ड (credit card) आणि डेबिट कार्ड (debit card) घेणं तसंच आयकर विवरणपत्र भरण्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे. बऱ्याचदा पॅन कार्ड हरवतं किंवा खराब होतं. अशावेळी मग अनेक अडचणी येतात. 

मात्र, आता तुम्ही चुकून कधीतरी कुठेतरी तुमचे पॅन कार्ड हरवले किंवा खराब झाले तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण आता आयकर विभागाच्या incometax.gov.in नवीन आयकर पोर्टल (Income Tax Portal) वरून तुमचे ई-पॅन  कार्ड (e -pan card) त्वरित डाउनलोड करता येणार आहे. ई-पॅन कार्ड डाऊनलोड (e-Pan Card Download) करण्याची संपूर्ण प्रक्रिया आपण जाणून घेऊया

आयकर संबंधित नियमांमध्ये बदल झाले असल्यामुळे आपल्या पॅन कार्डची हार्ड कॉपी आवश्यकता नसते. तुम्ही सॉफ्ट कॉपीसुद्धा वापरु शकता. UTITSL किंवा NDSL-TIN या दोन्ही एजन्सी ई-पॅन कार्ड जारी करतात. नवीन व जुन्या पॅनकार्डधारकांना ही सुविधा लागू आहे. मात्र, आयकर विभागाने जारी केलेली पॅन कार्डची पीडीएफ फाइल देखील यासाठी वैध असते.

ई-पॅन कार्डसाठी प्रक्रिया

१. सर्वप्रथम आयकर वेबसाईट https://www.incometax.gov.in/iec/foportal वर लॉगिन करा.

२. त्यानंतर ‘Instant E PAN’ वर क्लिक करा.

३. यात ‘New E PAN’ वर क्लिक करा.

४. त्यात तुम्ही तुमचा पॅन नंबर लिहा.

५. जर तुम्हाला तुमचा पॅन नंबर लक्षात नसेल तर त्याऐवजी तुमचा आधारकार्ड नंबरही टाकू शकता

६. यात अनेक अटी आणि शर्थी दिल्या आहेत. त्या काळजीपूर्वक वाचा आणि मग ‘Accept’ वर क्लिक करा.

७. त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. तो त्यात नोंदवा.

८. यानतंर दिलेला तपशील वाचून Confirm वर क्लिक करा.

९. त्यानंतर आता तुमचा पॅन पीडीएफ स्वरूपात तुमच्या ईमेल आयडीवर पाठविला जाईल.

१०. यानंतर तुम्ही तुमचा ‘e-Pan’ डाउनलोड करू शकता.

आधारच्या मदतीने पॅन कार्ड डाउनलोड 

जर तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक आठवत नसेल तर तुम्ही तुमच्या आधार कार्डाच्या मदतीने ई-पॅनकार्ड डाउनलोड करू शकता. पण यासाठी तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्डची लिंक असणं बंधनकारक आहे. पॅन आणि आधार जोडलेला नसेल तर ई-पॅन डाऊनलोड करु शकत नाही. 

डुप्लिकेट पॅन कार्ड मिळविण्यासाठी Online किंवा Offline अर्ज

डुप्लिकेट पॅन कार्ड मिळविण्यासाठी तुम्ही अर्ज करु शकता. आता डुप्लिकेट पॅन कार्ड मिळवणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे झाले आहे. ही प्रक्रिया पुर्वी फारच किचकट आणि विलंब लावणारी होती. पण आता डिजीटल जमाना असल्यामुळे ही प्रक्रिया सुकर झाली आहे. तुम्ही डुप्लिकेट पॅन कार्ड Online किंवा Offline पद्धतीने मिळवू शकता.

ऑफलाइन अर्ज  

डुप्लीकेट पॅन कार्डसाठी ऑफलाइन अर्ज भरण्यासाठी आपण टीआयएन सुविधा केंद्र, आयटी पॅन सेवा केंद्रे किंवा पॅन केंद्रांवर जाऊन सेवा घेऊ शकता. याशिवाय तुम्ही आयकर विभागाची अधिकृत वेबसाईट्स www.incometaxindia.gov.in , www.utiitsl.com किंवा www.tin-nsdl.com आदींवरही ऑफलाइन अर्ज भरु शकता. ज्यामुळे तुम्हाला डुप्लिकेट पॅन कार्ड प्राप्त होऊ शकेल. 

आॅनलाईन अर्ज

- www.onlineservices.nsdl. com/paam/ReprintEPan.html या लिंकवर तुम्हांला ऑनलाईन अॅप्लिकेशन करता येऊ शकते.

- या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक रिक्वेस्ट फॉर्म उघडेल.

- त्यामध्ये तुम्हाला पॅन नंबर, आधार नंबर, जन्म तारीख असे अपडेट भरायचे असतात.

- यावेळी आधार कार्डचे डिटेल्स वापरत तुम्हाला नवं कार्ड रिप्रिंट करण्यासाठी अनुमती द्यावी लागते

- त्यानंतर कॅप्चा एंटर करा.

- त्यानंतर तुमची ऑनलाईन रिक्वेस्ट सबमीट केली जाते.

ऑनलाईन रिप्रिंट अॅप्लिकेशन करताना ते NSDL e-Gov किंवा Instant e-PAN’ facility द्वारा पॅन कार्ड साठी अर्ज केला जाऊ शकतो. आधार कार्ड आणि पॅन कार्ड वर सारखाच मोबाईल क्रमांक असणं आवश्यक आहे. तसं नसल्यास त्यासाठी वेगळी रिक्वेस्ट करावी लागते. बदल करण्यासाठी मोबाईल क्रमांक रजिस्टर असणं आवश्यक आहे.

भारतामध्ये पॅन कार्ड घरपोच मिळावे यासाठी ५० रूपये तर भारताबाहेर ९५९ रूपये आणि टॅक्स अशी किंमत आकारली जाते. रीप्रिंट केलेले कार्ड त्या पत्त्यावर पाठविले जाते जे आयकर विभागाच्या डेटाबेसमध्ये उपलब्ध आहे.

हे ही करा

१)  आपल्या महत्वाच्या डॉक्युमेंटचे फोटो काढुन स्वतला मेल करुन ठेवा.

२) मोबाईलमध्ये पॅन, आधार, लायसन्स महत्वाचे नंबर सेव करुन ठेवा.

३) नेहमी झेरॉक्स सोबत ठेवा. यामुळे डॉक्य़ुमेंट हरवले तरी एक बॅकअप तुमच्या कडे असतो.



हेही वाचा -

पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी मुदतवाढ, 'ही' आहे शवटची तारीख

रिलायन्सनं गुगलसोबत मिळून लॉन्च केला जियोफोन नेक्स्ट, १० सप्टेंबरपासून होणार विक्री

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा