Advertisement

पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी मुदतवाढ, 'ही' आहे शेवटची तारीख

पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे.

पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी मुदतवाढ, 'ही' आहे शेवटची तारीख
SHARES

पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत आता ३० सप्टेंबरपर्यंत करण्यात आली आहे. यासंदर्भातील घोषणा अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे.

जर आधारशी पॅन कार्ड लिंक केलं नाही तर तुम्हाला १००० रुपये दंड भरावा लागू शकतो. केंद्र सरकारनं आयकर कायदा १९६१ कलम 234H मुळे पॅन कार्ड आधारशी लिंक करणं अनिवार्य केलं आहे. २३ मार्च रोजी लोकसभेत हे वित्त विधेयक सरकारनं मंजूर केलेलं आहे.

आपण शासनानं दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत जर आपला आधार पॅनशी लिंक केला नाही तर यासाठी आपल्याला एक हजार रुपये दंड भरावा लागू शकतो. तसंच एखाद्या व्यक्तीनं शेवटच्या तारखेपर्यंत आपला पॅन आधारशी जोडला नाही, तर त्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय होण्याची शक्यता आहे.

म्हणजेच लिंक न केल्यास 30 सप्टेंबरनंतर ते पॅन कार्ड आर्थिक व्यवहारात वापरले जाणार नाही. याचा सर्व प्रकारच्या बँकिंग व्यवहारांवर परिणाम होईल. म्युच्युअल फंड, डिमॅट अकाऊंट उघडणे, नवीन बँक खाते उघडणे पॅनशिवाय आपण या सर्व गोष्टी करू शकणार नाही.

सर्व प्रथम आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईट https://www.incometax.gov.in/iec/foportal वर जा. खाली दिलेल्या लिंक आधारच्या पर्यायावर क्लिक करा.

आपले स्टेटस पाहण्यासाठी Click here वर क्लिक करा. नवीन विंडोवर पॅन आणि आधार तपशील भरा. तिथे आधार आणि पॅन लिंक आहे की नाही तपासा आणि नसेल तर लगेच लिंक करा.



हेही वाचा

रिलायन्सनं गुगलसोबत मिळून लॉन्च केला जियोफोन नेक्स्ट, १० सप्टेंबरपासून होणार विक्री

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा