Advertisement

रिलायन्सनं गुगलसोबत मिळून लॉन्च केला जियोफोन नेक्स्ट, १० सप्टेंबरपासून होणार विक्री

अँड्रॉइड-आधारित स्मार्टफोनची ऑपरेटिंग सिस्टम जिओ आणि गुगल यांनी संयुक्तपणे तयार केली आहे.

रिलायन्सनं गुगलसोबत मिळून लॉन्च केला जियोफोन नेक्स्ट, १० सप्टेंबरपासून होणार विक्री
SHARES

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओ आणि गूगलच्या भागीदारीत बनवलेला नवीन स्मार्टफोन जिओफोन नेक्स्टची घोषणा केली आहे. नवीन स्मार्टफोनमध्ये जिओ आणि गूगलची वैशिष्ट्ये आणि अ‍ॅप्स असतील. या अँड्रॉइड-आधारित स्मार्टफोनची ऑपरेटिंग सिस्टम जिओ आणि गूगल यांनी संयुक्तपणे तयार केली आहे.

मुकेश अंबानी यांनी जाहीर केलं की, नवीन स्मार्टफोन सामान्य माणसाच्या हिशोबानं बनवण्यात आला आहे. हा अत्यंत परवडणारा असेल आणि १० सप्टेंबरपासून अर्थात गणेश चतुर्थीपासून विक्री केली जाईल. अंबानी म्हणाले की, देशाला 2G मुक्त 5G बनवणं हे आमचं लक्ष्य आहे.

भारतीय बाजारपेठेसाठी खास तयार केलेल्या जियोफोन नेक्स्ट स्मार्टफोनवर वापरकर्ते गुगल प्ले वरून अ‍ॅप्स डाउनलोड करू शकतात. स्मार्टफोनमध्ये सर्वोत्कृष्ट कॅमेरा आणि अँड्रॉइड अपडेटसुद्धा मिळवू शकतात. मुकेश अंबानी यांनी संपूर्णपणे वैशिष्ट्यीकृत स्मार्टफोनचे वर्णन केवळ भारतातच नव्हे तर जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन म्हणून केले आहे. अद्याप याच्या किंमतीविषयी माहिती देण्यात आली नाही.

गेल्या वर्षी रिलायन्स जिओने गुगलबरोबर भागीदारीची घोषणा केली होती. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी नवीन स्मार्टफोनबद्दल सांगितलं होतं की, आमची पुढील पायरी Google आणि Jio च्या सहयोगानं बनवलेल्या नवीन, परवडणार्‍या जिओ स्मार्टफोनपासून सुरू होते. हे भारतासाठी तयार केले गेले आहे आणि लाखो नवीन वापरकर्त्यांसाठी नवीन शक्यता उघडेल जे प्रथमच इंटरनेटचा अनुभव घेतील. गुगल क्लाऊड आणि जिओ यांच्यात नवीन 5G जी भागीदारी अब्जाहून अधिक भारतीयांना वेगवान इंटरनेटशी जोडण्यात आणि भारताच्या पुढच्या टप्प्यातील डिजिटायझेशनची पायाभरणी करण्यास मदत करेल.

अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की, आम्ही 5G इकोसिस्टम विकसित करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर 5 जी उपकरणे विकसित करण्यासाठी जागतिक भागीदारांसोबत काम करत आहोत. जिओ केवळ भारताला 2G मुक्त करण्यासाठीच कार्य करत नाही तर 5G युक्त देखील करत आहे.

डेटा वापरण्याच्या बाबतीत जिओ जगातील दुसर्‍या क्रमांकाचे नेटवर्क बनले आहे. रिलायन्स जिओच्या नेटवर्कवर दरमहा 6300 दशलक्ष जीबी डेटा वापरला जातो. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 45 टक्के जास्त आहे.



हेही वाचा

पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं, मुंबईत आहे 'इतका' दर

जेट एअरवेज पुन्हा उडणार? NCLTनं स्वीकारला कारलॉक-जालनचा प्रस्ताव

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा