Advertisement

पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं, मुंबईत आहे 'इतका' दर

मागील काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. या महिन्यात आतापर्यंत १३ वेळा दर वाढवण्यात आले आहेत.

पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं, मुंबईत आहे 'इतका' दर
SHARES

देशात पुन्हा एकदा पेट्रोल (petrol) आणि डिझेल (diesel) महागलं आहे. गुरूवारी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. पेट्रोलचे दर २६ पैशांनी तर डिझेलचा भाव ७ पैशांनी वाढवला आहे. 

मागील काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. या महिन्यात आतापर्यंत १३ वेळा दर वाढवण्यात आले आहेत. गुरूवारच्या भाववाढीनंतर मुंबईत पेट्रोलची किंमत १०३.८९ रुपये आणि डिझेलची किंमत ९५.७९ रुपये प्रती लीटर झाली आहे. तर दिल्लीत पेट्रोलचा दर ९७.७६ रुपये असून डिझेलचा दर ८८.३० रुपयांवर गेला आहे. या महिन्यात पेट्रोल पेट्रोल ३ रुपया ५३ पैसे आणि डिझेल ३ रुपये १५ पैशांनी महागलं आहे.

या दरवाढीने देशातील १४ राज्यात पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, तेलंगणा, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, पंजाब, मणिपूर, ओरिसा, चंदीगड, तमिळनाडू आणि लडाख या राज्यात पेट्रोलचे दर १०० रुपयांच्या वर गेले आहेत. 

पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि तामिळनाडू राज्यात झालेल्या निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. देशात दररोज पेट्रोल, डिझेलच्या किंमती या क्रूड तेलाच्या किंमती आणि परकीय चलन दरानुसार बदलत असतात. नवे दर देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर दररोज सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतात. 

मार्च महिन्यात १६ वेळा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यात आले होते. तर मे महिन्यात सलग ४ दिवस इंधनाची दरवाढ झाली होती. जानेवारीत १० वेळा आणि फेब्रुवारीमध्ये १६ वेळा पेट्रोल, डिझेल महागलं आहे. तर मार्चमध्ये ३ वेळा आणि एप्रिलमध्ये १ वेळा किमती कमी झाल्या आहेत. 

सध्या केंद्र सरकार पेट्रोलवर ३२.९८ प्रतिलिटर तर डिझेलवर ३१.८३ रुपये प्रतिलिटर कर आकारत आहे. तर महाराष्ट्र सरकार पेट्रोलवर २५ टक्के व्हॅट आणि डिझेलवर २१ टक्के व्हॅट लावते. तसंच यावरही अधिकचा सेस लावला जातो. पेट्रोलवर १० रुपये प्रतिलिटर, तर डिझेलवर ३ रुपये प्रतिलिटर इतका सेस लावण्यात येतो. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढताना दिसत आहेत.



हेही वाचा -

सलग दुसऱ्या दिवशी राज्यात लसीकरणाचा विक्रमी उच्चांक

डेक्कन एक्स्प्रेस 'विस्टाडोम'सह २६ जूनपासून पुन्हा धावणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा