Advertisement

डेक्कन एक्स्प्रेस 'विस्टाडोम'सह २६ जूनपासून पुन्हा धावणार

पुणे-मुंबई मार्गावर रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

डेक्कन एक्स्प्रेस 'विस्टाडोम'सह २६ जूनपासून पुन्हा धावणार
SHARES

पुणे-मुंबई मार्गावर रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोरोना कालावधीत बंद केलेली डेक्कन एक्स्प्रेस २६ जूनपासून पुन्हा सुरू होणार आहे. तिला ‘विस्टाडोम’ डबा जोडण्यात येणार आहे. 'विस्टाडोम' म्हणजेच छतासह बहुतांश भाग पारदर्शी असलेला आणि विविध सुविधा असलेला डबा असणार आहे.

पुणे ते मुंबई हा रेल्वे मार्ग लोणावळा-खंडाळ्यासह नयनरम्य निसर्गाच्या कुशीतून जातो. पावसाळ्यात हिरवाई आणि कोसळणाऱ्या धबधब्यांमुळं या मार्गावरील निसर्गाचे रूप आणखी मनोहारी होते. सध्या पर्यटनस्थळांना बंदी असली, तरी प्रवासातून हा निसर्ग आपल्याला पाहता येणार आहे.

२६ जूनपासून मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी ७ वाजता सुटेल, ती सकाळी ११.०५ वाजता पुणे स्थानकावर पोहोचेल. पुण्यातून ही गाडी दरदिवशी दुपारी ३.१५ वाजता सुटून संध्याकाळी ७.०५ वाजता मुंबईत पोहोचेल. प्रवासासह परिसरातील निसर्गाचा प्रवाशांना पुरेपूर आनंद देण्याच्या दृष्टीने रेल्वेने विस्टाडोम डब्यांची संकल्पना आणली आहे. सध्या मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला अशा प्रकारचा डबा जोडण्यात येत आहे. त्यातून कोकण आणि गोव्यापर्यंतच्या निसर्गाची अनुभूती प्रवाशांना मिळते आहे.

पुणे-मुंबई प्रवासात लोणावळा आणि खंडाळ्याचा देखणा परिसर येतो. पावसाळ्यात कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी या भागात दूरवरून पर्यटक येत असतात. ही अनुभूती प्रवासी गाडीतून घेऊ शकतात. त्याचप्रमाणे उल्हास नदी, सोनिगिर टेकडी, नेरळजवळ माथेरानचा डोंगर आदी निसर्गरम्य ठिकाणांसह मार्गात येणाऱ्या बोगद्यांतील प्रवासाचाही आनंद घेता येणार आहे.

या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, नेरळ (केवळ मुंबईतून येताना), लोणावळा, तळेगाव, खडकी आणि शिवाजीनगर येथे थांबा असेल. तिला विस्टाडोम डब्यासह ३ वातानुकूलित चेयर कार, १० द्वितीय क्षेणीचे डबे असणार आहेत. गाडीचे आरक्षण २४ जूनला सुरू करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून कळविण्यात आले आहे.

डब्यांची वैशिष्ट्ये

  • विस्टाडोम डब्यांच्या काचेच्या खिडक्या सामान्य डब्यांच्या तुलनेत मोठ्या आहेत. 
  • छतालाही काचेच्या खिडक्या आहेत. 
  • चारही बाजूने निसर्गाचे रूप पाहण्यासाठी गॅलरीचीही व्यवस्था. 
  • आरामदायक आणि नव्वद अंशाच्या कोनात फिरणारी आसने.



हेही वाचा -

Corona vaccine : २ वर्षांवरील मुलांचही होणार लसीकरण

  1. वन रुपी क्लिनिकचे संस्थापक राहुल घुलेंचा आत्महत्येचा प्रयत्न
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा