Advertisement

जेट एअरवेज पुन्हा उडणार? NCLTनं स्वीकारला कारलॉक-जालनचा प्रस्ताव

आर्थिक संकटात अडकलेली जेट एअरवेज पुन्हा एकदा उड्डाण करण्याच्या तयारीत आहे.

जेट एअरवेज पुन्हा उडणार? NCLTनं स्वीकारला कारलॉक-जालनचा प्रस्ताव
SHARES

आर्थिक संकटात अडकलेली जेट एअरवेज पुन्हा एकदा उड्डाण करण्याच्या तयारीत आहे. वित्तसंस्था नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या (एनसीएलटी) मुंबई खंडपीठानं कारलॉक कॅपिटल आणि मुरारी लाल जालनच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

दोन्ही कंपन्यांनी जेट एअरवेज चालवण्यासंदर्भात ठराव आराखडा कर्जदारांसमोर मांडला होता. याच ठरावाला मंजुरी देण्यात आल्याने जेट एअरवेज पुन्हा आकाशात उड्डाण भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पीटीआयनं यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

जेट एअरवेजनं आर्थिक संकटामुळे १७ एप्रिल २०१९ मध्ये आपलं काम थांबवलं आहे.

कारलॉक कॅपिटल आणि मुरारी लाल जालन यांना ९० दिवसांमध्ये संबंधित यंत्रणांकडून मंजुरी मिळवायच्या आहेत. ऑक्टोबर २०२० मध्ये जेट एअरवेजला पुनरुज्जीवित करण्यासाठी कॅलरॉक कॅपिटल आणि मुरारी लाल जालन यांनी लावलेल्या बोलीला कर्जदारांनी मान्यता दिली होती. मात्र या दोन्ही कंपन्यांकडे एअरलाइन्स चालवण्याचा अनुभव नाही. कॅलरॉक कॅपिटल एक अॅसेट मॅनेजमेंट कंपनी आहे तर मुरारी लाल जालन संयुक्त अरब अमिरातीमधील उद्योजक आहेत.

ठराव योजनेनुसार, जेट एअरवेजला पुनरुज्जीवित करण्यासाठी १ हजार ३७५ कोटींच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव ठेवला आहे. तसंच नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलची मंजुरी मिळाल्यानंतर सहा महिन्याच्या आत इतर ३० विमान कंपन्यांसोबत जेट एअरवेज पुन्हा काम सुरू करेल असंही सांगण्यात आलं आहे.

जेट एअरवेजला मार्च २०२० ला आर्थिक वर्षाच्या अखेरीस २ हजार ८४१ कोटींचं नुकसान झालं होतं. कंपनीची विमानसेवा जवळपास गेल्या दोन वर्षांपासून स्थगित आहे.

कंपनीनं बीएसईकडे दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये कंपनीचं एकूण उत्पन्न ३५४ कोटी रुपये होतं. याआधीच्या आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये कंपनीला ५५३५ कोटींचं नुकसान झालं होतं. कंपनी सध्या दिवाळखोरीच्या संकटात आहे.

भारतात कोरोनामुळे प्रवाशांची मागणी कमी होण्याच्या आधीपासूनच विमानसेवेतून पैसा कमवणं आव्हानात्मक झालं आहे. विमान तिकीटांवरुन सुरू असलेली स्पर्धा तसंच महागड्या तिकीटांमुळे अनेक विमान कंपन्या मार्केटमध्ये टिकून राहावं यासाठी धडपडत आहेत.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा