महाराष्ट्रात पुन्हा मास्कसक्ती होऊ शकते? उद्धव ठाकरे म्हणाले...

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महाराष्ट्रात सध्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकार चिंतेत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मास्क संदर्भात महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे.

बेस्ट एनसीएमसी कार्डचा लोकार्पण सोहळा सोमवारी पार पडला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोना गेला असं वाटत आहे. पण जोपर्यंत राज्याचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मास्क काढत नाही तोपर्यंत तुम्हीदेखील मास्क काढू नका. मास्कसक्ती नसली तरी अजून मास्कमुक्ती झालेली नाही.”

दरम्यान, आता तिन्ही वाहतुकींसाठी एकच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएससी कार्ड) जारी करण्यात आलं आहे. याचेच लोकार्पण सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, मुंबई महानगर पालिकेचे प्रशासक आयुक्त इक्बालसिंह चहल उपस्थित होते.

देशात वाढणाऱ्या कोरोना रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमिवर कर्नाटक शासनानं राज्यात पुन्हा एकदा सर्व नागरिकांना मास्कची सक्ती केली आहे. तसंच सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, प्रवासा दरम्यान प्रत्येकाला मास्क वापरणे अत्यावश्यक असल्याचे शासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या आदेशात सांगण्यात आले आहे.

गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील मास्क बंदी मागे घेण्यात आली होती. मात्र आता पुन्हा रूग्ण सापडत आहेत. त्यात नागरिक मात्र मास्क वापरताना दिसत नाहीत. त्यामुळे परिस्थिती बिघडू शकते. असे होऊ नये म्हणून राज्यातही कदाचित पुन्हा मास्क सक्ती होऊ शकते.


हेही वाचा

पाच वर्षांत मुंबई मलेरियामुक्त! पालिकेचे ‘मिशन ‘झीरो मलेरिया’

समृद्धी महामार्गाचे लोकार्पण लांबणीवर, 'हे' आहे कारण

पुढील बातमी
इतर बातम्या