Advertisement

समृद्धी महामार्गाचे लोकार्पण लांबणीवर, 'हे' आहे कारण

मुंबई ते नागपूर समृध्दी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) उद्घाटनाचा मुहूर्त २ मे रोजी ठरला होता.

समृद्धी महामार्गाचे लोकार्पण लांबणीवर, 'हे' आहे कारण
SHARES

मुंबई ते नागपूर समृध्दी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) उद्घाटनाचा मुहूर्त २ मे रोजी ठरला होता. पण आता उद्घाटन पुढे ढकलण्यात आले आहे. समृध्दी महामार्गाचे उद्घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते होणार होते.

पहिल्या टप्प्यात वाशीम जिल्ह्यातील शेलू बाजार ते नागपूर असा २४० किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. महामार्गाचे लोकार्पण लांबणीवर पडले असल्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

वाईल्ड लाईफ व्होहर पाथ नागपूर पासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामधे विशेष अर्च तयार करण्यात आले आहेत. त्यातील १०५ नंबरचे अर्च खराब झाले आहे. त्यामुळे ते सुपर स्ट्रक्चर नव्यानं बनवायचा निर्णय घेतला आहे. त्यामूळे उद्घाटन पुढे ढकलण्यात आलं आहे. लवकरच पुढील तारीख कळवण्यात येईल, असं मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

समृद्धी महामार्गाचे काम २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. पण अनेक कारणांमुळे प्रकल्पाचे काम विलंबाने सुरू आहे. असे असताना नागपूर ते सेलू बाजार, वाशीम या २१० किमीच्या टप्प्यातील १०० टक्के काम पूर्ण झालं आहे.

निविदा सादर करण्यासाठी २५ एप्रिल अंतिम तारीख असून २ मेपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करून टोल यंत्रणा कार्यान्वित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचं आव्हान सध्या आहे. समृद्धी महामार्ग सुरू झाल्यानंतर नागपूर ते मुंबई हे ७०० किमी अंतर केवळ सात तासांमध्ये पार करता येणार आहे.



हेही वाचा

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड: दुहेरी बोगद्याचे काम फेब्रुवारी २०२३ पासून होणार सुरू

परळमधल्या 'या' पूलाची पुनर्बांधणी करण्याची पालिकेची योजना

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा