महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची पुनर्रचना

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची पुनर्रचना करण्यात आली असून याबाबतचा जीआर मंगळवारी राज्य सरकारने प्रकाशित केला. या मंडळात ३१ सदस्यांचा समावेश असून त्यातील काही सदस्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे.

करंबळेकर पुन्हा अध्यक्षपदी

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी अध्यक्षपदी दिलीप करंबेळकर यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. तर विविध क्षेत्रातील दिग्गजांचीही मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे, प्रा. अविनाश कोल्हे हेदेखील मंडळावर सदस्य म्हणून कार्यरत असतील.

यापूर्वी मंडळाला मुदतवाढ

राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचा कालावधी ४ ऑगस्ट २०१८ रोजी संपुष्टात आला होता. त्यानंतर २८ ऑगस्ट २०१८ रोजी मंडळाची पुनर्रचना होईपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर आता मंगळवारी राज्य शासनाने परिपत्रक काढून पुनर्रचना केल्याची माहिती दिली. मराठी विश्वकोशाच्या विषयनिहाय अद्ययावतीकरणासाठी ज्ञानमंडळाचीही स्थापना करण्यात आली आहे. राज्यभरातील ज्ञानमंडळांनी १ हजार ५०० हून अधिक नोंदी अद्ययावत केल्या असून या ज्ञानमंडळांना नुकतीच मुदतवाढ देण्यात आली आहे.


हेही वाचा -

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

मुंबई राज्यातील सर्वात प्रदूषित शहर


पुढील बातमी
इतर बातम्या