पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग

Credit: ANI
Credit: ANI
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोना (coronavirus) प्रतिबंधक ‘कोव्हिशिल्ड’ लशीचं उत्पादन करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग लागली आहे. आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न करण्यात येत आहेत. इमारतीत अडकलेल्या ४ कर्मचाऱ्यांपेकी तिघांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे, तर, एका कर्मचाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे.

मांजरी येथील सीरम इन्स्टिट्यूटमधील बीसीजी प्लांटमधील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर ही आग लागली असून आग चौथ्या आणि पाचव्या मजल्यापर्यंत पसरली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या त्वरीत  घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी अटोकाट प्रयत्न करत असून अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.

हेही वाचा- नवी मुंबईत कोरोना लसीकरणासाठी निरुत्साह

आग लागलेल्या ठिकाणी आगीचे प्रचंड लोट दिसत असल्याने इमारत परिसरात लोकांनी गर्दी केली आहे. सुदैवाने ‘कोव्हिशिल्ड’ लसीची निर्मिती ज्या ठिकाणी होते, ते ठिकाण आगीपासून सुरक्षित असल्याचं सीरमकडून सांगण्यात आलं आहे. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

ज्या प्लांटमध्ये ही आग लागली आहे तिथं रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घेतली जाणारी बीसीजी लस तयार केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली होती त्याच इमारतीत ही आग लागलेली आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. महत्वाचं म्हणजे कोरोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ लस तयार केली जाते तेथून हा भाग काही अंतरावर आहे. सुदैवाने अद्याप आगीची झळ तिथपर्यंत पोहोचलेली नाही.

हेही वाचा- मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल ४११ दिवसांवर

पुढील बातमी
इतर बातम्या