Advertisement

नवी मुंबईत कोरोना लसीकरणासाठी निरुत्साह

नवी मुंबईत मागील शनिवारपासून कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली. मात्र लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे.

नवी मुंबईत कोरोना लसीकरणासाठी निरुत्साह
SHARES

नवी मुंबईत मागील शनिवारपासून कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली. मात्र लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे. नवी मुंबईत रोज ४०० जणांचं लसीकरण करण्यात येणार होतं. मात्र, त्यापेक्षा कमीच लसीकरण झालं आहे.   शनिवारी ३१३, मंगळवारी २३७ व बुधवारी ३६१ जणांचं लसीकरण झालं आहे.  

लसीकरणाबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केलं आहे. नवी मुंबईत चार केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे. प्रत्येक केंद्रावर शंभर असे रोज चारशे जणांचं लसीकरण करण्याचं नियोजन आहे.

शनिवारी १६ जानेवारी रोजी पहिल्याच दिवशी ४०० पैकी ३१३ जण लसीकरणास उपस्थित राहिले. मंगळवारी फक्त २३७ जणांनी लसीकरण करून घेतले. तर बुधवारी ३६३ जणांचं लसीकरण झाल्याने थोडाफार दिलासा मिळाला आहे. लसीकरण करणाऱ्यांची  संख्या वाढवण्यासाठी पालिकेच्या वतीने योग्य खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडे एकूण २१ हजार २५० लशींच्या कुप्या आल्या आहेत. पालिकेचे लसीकरणासाठी ५० केंद्रांचे नियोजन आहे.लसीकरणासाठी नोंदणी झालेल्या आरोग्यकर्मींना त्यांचे लसीकरण कोणत्या केंद्रावर, कोणत्या तारखेला, कोणत्या वेळेत होणार आहे, याचा संदेश मोबाइलवर प्राप्त होणार आहे.



हेही वाचा -

महिनाअखेरीस महाविद्यालये होणार सुरू?

लसीकरणासाठी महापालिकेनं दिली 'ही' सवलत



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा