Advertisement

मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल ४११ दिवसांवर

मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या घटत चालली आहे. तसंच उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे.

मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल ४११ दिवसांवर
SHARES

मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या घटत चालली आहे. तसंच उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे. मुंबईत रुग्ण दुपटीचा सरासरी कालावधी तब्बल ४११ दिवसांपर्यंत म्हणजे सुमारे वर्षभरापेक्षा जास्त वाढला आहे. 

मुंबईतील रुग्ण वाढीचा सरासरी दर ०.२१ टक्क्यावर स्थिर आहे. सध्या मुंबईत ६६५४ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. बुधवारी ५०१ नवीन रुग्ण आढळले. तर ९ रुग्णांचा मृत्यू झाला.

मुंबईत बुधवारी कोरोनाचे ५०१ नवे रुग्ण आढळले.  तर ९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता ३,०४,१२२ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा ११,२६६ इतका झाला आहे. तसेच  बुधवारी दिवसभरात ४९० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने मुंबईत आतापर्यंत २,८५,३०७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.  ९४ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट झाली असून सध्या ६६५४ रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यापैकी सुमारे दोन हजार रुग्णांना लक्षणे असून सुमारे ३०० रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

राज्यात बुधवारी ३,०१५ करोनाबाधित आढळले, तर ५९ जणांचा मृत्यू झाला. सध्या ४६,७६९ रुग्ण उपचाराधीन आहेत. आतापर्यंत १९ लाख ९७ हजार करोनाबाधित झाले असून, ५०,५८२ जणांचा मृत्यू झाला आहे.



हेही वाचा -

महिनाअखेरीस महाविद्यालये होणार सुरू?

लसीकरणासाठी महापालिकेनं दिली 'ही' सवलत



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा