मिरा रोडमधील जवान सीमेवर शहीद!

जम्मू-काश्मीरमध्ये सीमेवर अतिरेक्यांशी लढताना सोमवारी ४ जवान शहीद झाले. यामध्ये मिरा रोडमधील मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांचाही समावेश आहे. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच मिरा रोडच्या शीतल नगरमध्ये अवकळा पसरली. ३४ वर्षीय शहीद कौस्तुभ त्यांच्या कुटुंबाचा एकमेव आधार होता. त्यांच्यामागे अाई-वडील, पत्नी, दीड वर्षांचा मुलगा अाणि बहीण असा परिवार अाहे.

अाई-वडील निवृत्त 

सीमेवर लढताना कौस्तुभ राणे शहीद झाल्याची वार्ता कळताच त्यांचं निवासस्थान असलेल्या शीतल नगरमधील हिरल सागर इथं मंगळवारी रहिवाशांनी गर्दी केली. मूळचे कोकणातील असलेले कौस्तुभ मागील ३० वर्षांपासून मिरा रोड इथं राहत होते. मिरा रोडमधील होली क्रॉस शाळेत त्यांचं शिक्षण झालं होतं. त्यांचे वडील टाटा कंपनीत नोकरी करत होते. तर अाई बोरिवलीमधील शाळेत शिक्षिका होत्या. दोघेही अाता निवृत्त झाले आहेत. 

मदत करणारा स्वभाव 

कौस्तुभ यांचा स्वभाव मितभाषी होता. ते नेहमीच गरजवंतांच्या हाकेला धावून जायचे, अशी माहिती त्यांच्या मित्रमंडळींनी दिली. त्यांचे काका म्हणाले की,  कौस्तुभ या वर्षी जानेवारीत घरी अाले होते. त्यांच्याशी शेवटची भेट तेव्हाच झाली होती. कौस्तुभ यांचं पार्थिव येण्याची अाता सर्वजण वाट पाहत अाहेत.

घुसखोरीचा प्रयत्न

जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज क्षेत्रात सोमवारी रात्री घुसखोरीचा प्रयत्न करत असलेल्या अतिरेक्यांशी लढताना मेजर कोस्तुभ राणे हवालदार जे. सिंह, हवालदार विक्रम जीत और रायफलमॅन मनदीप सिंह शहीद झाले.


हेही वाचा -

दिव्यांगांच्या बैठकीत धुडगूस, जोशी सरही झाले हैराण

म्हाडावर नामुष्की! १९ आॅगस्टची लाॅटरी २५ आॅगस्टवर


पुढील बातमी
इतर बातम्या