Advertisement

दिव्यांगांच्या बैठकीत धुडगूस, जोशी सरही झाले हैराण


दिव्यांगांच्या बैठकीत धुडगूस, जोशी सरही झाले हैराण
SHARES

मुंबईतील अंध व अपंग असलेल्या दिव्यांगांच्या विविध समस्यांसंदर्भात महापौरांच्या अध्यक्षतेखाली बोलावल्या बैठकीत दिव्यांगांनी धुडगूस घातल्यामुळे अखेर ही बैठकच गुंडाळण्यात आली. अपंगांमध्येच एकमत नसल्यामुळे, आधी तुमचं एकमत करा, मगच महापालिकेशी बोलायला या, असं सांगत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी बैठक कोणत्याही निर्णयाविना संपवून टाकली.


बैठकीचं कारण काय?

मुंबईतील दिव्यांगांच्या विविध मागण्यासंदर्भात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक मंगळवारी दुपारी महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मुंबईतील अपंगांच्या ४० संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.


जोशी यांचा पुढाकार

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी पुढाकार घेऊन या बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, उपायुक्त(विशेष) निधी चौधरी आदी उपस्थित होते. तर दिव्यांगांच्या संघटनांच्यावतीनं सूर्यकांत लाडेंसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


जाणीवपूर्वक कारवाई

या बैठकीत प्रारंभीच दिव्यांगांच्या संघटनांनी अपंगांच्या टेलिफोन स्टॉल्सवर अन्य वस्तू विक्रीस ठेवण्याची मागणी केली. यावर उपायुक्त निधी चौधरी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत वाचून दाखवून मद्यविक्री तथा तंबाखूजन्य वस्तू वगळता अन्य सर्वप्रकारच्या वस्तू विकण्यास परवानगी दिली जात असल्याचं सांगितलं. परंतु यावर दिव्यांग संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी, महापालिकेचे अधिकारी जाणीवपूर्वक दिव्यांगांच्या स्टॉल्सवर कारवाई करत असल्याचं सांगत गदारोळ घालण्यास सुरुवात केली.


परिस्थिती हाताबाहेर

त्यामुळे दिव्यांगांना आवरणं कठीण होऊन बसलं. यावेळी सुरक्षा रक्षकांना बोलावून सर्व अपंगांना जागीच बसण्याचा सूचनाही केल्या. परंतु दिव्यांग काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात येताच मनोहर जोशी यांनी अशा परिस्थितीत चर्चा करणं योग्य ठरणार नाही. तुमच्यातच एकमत नसेल तर निर्णय कसा घ्यायचा? असं म्हणत आधी तुमचं सर्वांचं एकमत करा, मगच बैठक बोलावून सांगत ही बैठक रद्द करण्याची सूचना महापौरांनी केली. त्यामुळे मोठ्या प्रयत्नानंतर अपंगांना एकत्र आणण्याचा प्रयत्नही फोल ठरला.हेही वाचा-

शिवसेनेचे सगुण नाईक यांचं महापालिका सदस्यत्व रद्द

महापौरांच्या बिघडलेल्या वाहनावर पावणेचार लाखांचा खर्चसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा