Advertisement

शिवसेनेचे सगुण नाईक यांचं महापालिका सदस्यत्व रद्द


शिवसेनेचे सगुण नाईक यांचं महापालिका सदस्यत्व रद्द
SHARES

मुंबई महापालिका प्रभाग क्रमांक ९१ चे शिवसेना नगरसेवक सगुण नाईक यांचं महापालिका सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. जातप्रमाणपत्र पडताळणीत त्यांचं जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचं महापालिका सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय कोकण विभागीय आयुक्तांनी दिला होता. त्यानुसार महापालिका सभागृहात नगरसेवक सगुण नाईक यांचं महापालिका सदस्यत्व रद्द करण्यात आल्याची घोषणा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सोमवारी केली.


कोण आहेत सगुण नाईक?

मुंबई महापालिकेच्या २०१७ च्या सार्वजनिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९१ मधून शिवसेनेचे उमेदवार सगुण नाईक विजयी झाले होते. परंतु नाईक यांनी सादर केलेल्या जात प्रमाणपत्राबाबत दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसचे उमेदवार रफिक शेख यांनी आक्षेप नोंदवत कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानंतर सगुण नाईक यांना जात प्रमाणपत्र वैधतेबाबतचे पुरावे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नसल्याने त्यांचं जातप्रमाणपत्र अवैध ठरवत त्यांचं महापालिका सदस्यत्व रद्द करण्याचं पत्र कोकण विभागीय आयुक्तांनी महापालिका आयुक्तांना पाठवलं.


अधिकृत घोषणा

हे पत्र महापालिका चिटणीस यांच्याकडे सादर केल्यानंतर महापालिका सभागृहाच्या पटलावर घेण्यात आलं. हे पत्र वाचून दाखवत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सगुण नाईक यांचं महापालिका सदस्य रद्द झाल्याची घोषणा केली.


पैशांची मागणी

सगुण नाईक यांचं जातप्रमाणपत्र वैध ठरवण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पैशांची मागणी केली होती, असा गौप्यस्फोट विधानपरिषदेत आमदार अॅड. अनिल परब यांनी केला होता. त्यानंतर हे पत्र महापालिकेला पाठवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.


दुसऱ्यांना संधी

मागील २०१२ च्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत सपाचे लालजी यादव हे सांताक्रूझमधून निवडून होते. परंतु त्यांचं जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याने दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसचे उमेदवार रफिक शेख यांना विजयी घोषित करण्यात आलं होतं. तेच रफिक शेख सगुण पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर असल्यामुळे त्यांची निवड नगरसेवक म्हणून होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास निवडून आलेल्या उमेदवारीचं जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानं दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून येण्याचा मान शेख यांना मिळणार आहे.


महापालिकेतलं संख्याबळ

 

पक्षसंख्या
शिवसेना४ अपक्षांसह ९३
भाजपा८५
काँग्रेस३०
राष्ट्रवादी काँग्रेस०९
मनसे०१
समाजवादी पक्ष०६
एमआयएम०२

 
 



हेही वाचा-

'आरोग्य सेविकांच्या विरोधातील याचिका मागे घ्या'

महापौरांच्या बिघडलेल्या वाहनावर पावणेचार लाखांचा खर्च



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा