marigold flower rate झेंडूचे भाव कडाडले, ३०० रुपये किलो

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

गणेशोत्सवात बाप्पाला वेगवेगळ्या फुलांचा हार घालण्याठी फूल मार्केटमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. किलोच्या स्वरूपात फुलांची खरेदी केली जात असून, यंदा फुलांमध्ये झेंडूच्या फुलांना सर्वाधिक मागणी आहे. तसंच, या झेंडूचे भावही कडाडले आहेत. गतवर्षी १२० रुपये किलोपर्यंत स्थिरावलेला झेंडूचा दर यंदा दुपटीपेक्षा वाढून ३०० रुपये किलो इतका झाला आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर महापुराच्या फटक्यामुळं मुंबई बाजारात येणाऱ्या झेंडूची आवकच ७० टक्क्यांनी घटली आहे.

मुंबई आणि महानगर परिसरात झेंडूची आवक अधिक असून, ती सांगली, कोल्हापूर, सासवड-पुरंदर आणि जुन्नर या परिसरातून होते. त्यासाठीची लागवड प्रामुख्याने जून-जुलैच्या दरम्यान केली जाते. परंतु, यंदा लॉकडाऊनमुळं बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा फुलांची लागवड केली नाही. त्यात भर म्हणजे सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांमध्ये केलेल्या लागवडीला महापूराचा फटका बसला.

हेही वाचा - लॉकडाऊन शिथिल होताच पुन्हा फूलविक्रीला सुरूवात

गणेशोत्सवाच्या काळात अनेक मोठी मंडळं झेंडू घेऊन ठेवतात. तसंच, काही ग्राहकदेखील वैयक्तिक स्तरावर मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. यंदा मंडळांकडून फार प्रतिसाद नाही. तर काही ठिकाणाहून येणाऱ्या झेंडची गुणवत्ता नसल्यानं फुल फार काळ टिकत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. सर्वसाधारणपणे गणेशोत्सवाच्या आधी बाजारात झेंडूची आवक वाढू लागते. पण त्याचवेळी मागणीदेखील वाढत असल्याने दर चढे राहतात.

पावसामुळे मोगऱ्याची आवक घटली आहे. पूजेसाठी लागणारी चमेली, जास्वंद ही फुले, तसेच दुर्वा वसई, विरार परिसरातील शेतकरी लोकल रेल्वे गाड्यांतून घेऊन येतात. जास्वंदीच्या किंमतीत फारसा फरक पडलेला नाही मात्र अन्य फुलांची आवक लोकल सेवा बंद असल्याने कमी झाली आहे. त्याचा परिणाम किंमतीवर झाला आहे.

फुलांचे दर

  • झेंडू – ३०० रुपये किलो
  • जास्वंद - २० रुपयांना
  • पांढरी शेवंती – १६० रुपये किलो
  • लाल किंवा जांभळी शेवंती – ३२० रुपये किलो
  • डिस्को शेवंती – ४०० रुपये
  • गुलछडी / रजनीगंधा – ४०० किलो
  • गुलाब – ८० रुपये २० फुले
  • वानगाव मोगरा – ६०० र. किलो
  • विरार मोगरा – १४०० रुपये
  • चमेली – ८०० ते १००० रुपये किलो
  • जरभरा – ५० रुपये १० फुले
  • दुर्वा मोठी जुडी – ५० रुपये
  • चाफा – ३०० रुपये शेकडा


हेही वाचा -

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी २१२ कोरोना रुग्ण

मुंबईत क्वारंटाईनचे नियम बदलले, 'हा' आहे नवीन नियम


पुढील बातमी
इतर बातम्या