Advertisement

लॉकडाऊन शिथिल होताच पुन्हा फूलविक्रीला सुरूवात

लॉकडाऊनमुळं या फूल विक्रीला फटका बसला असून, मोठं आर्थिक नुकसानं झालं आहे.

SHARES

सण-उत्सव जवळ येताच दादरचं फूल मार्केट ग्राहकांच्या गर्दीने फूलून जातं. पण यावेळची परिस्थिती वेगळी आहे. कोरोना आणि लॉकडाऊनचा मोठा फटका इथल्या फूल बाजारालाही बसलाय. एरवी गजबजून जाणारा हा परिसर एकाएकी शांत झाला. तरीही उमेद न सोडता येथील फूल व्यापाऱ्यांनी लॉकडाऊन शिथिल होताच पुन्हा धंद्याला सुरूवात केली आहे.

मुंबईत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढत चालला असून, या जीवघेण्या कोरोनाचा फटका फूल उत्पादक शेतकरी, फूल विक्रेते यांना बसला आहे. फूलांचा व्यवसाय असणाऱ्या अनेक विक्रेत्यांवर आर्थिक संकट ओढावलं आहे. लॉकडाऊनपूर्वी दरदिवसाला बऱ्यापैकी व्यवसाय होत होता. परंतु, लॉकडाऊनच्या ३ महिन्यात व सध्यस्थितीत व्यवसाय कमी असल्यानं कामगारांना पगार देणं कठीण झालं आहे, अशी माहिती दादर येथील फूल विक्रेता रुग्वेद दुरासी यांनी दिली.

दादर येथील फूल मार्केटमध्ये फुलांच्या खरेदीसाठी मुंबईसह अनेक भागातून ग्राहत येत असतात. परंतू, लॉकडाऊनमुळं या फूल विक्रीला फटका बसला असून, मोठं आर्थिक नुकसानं झालं आहे. पहिल्यासारखा बाजार भावही मिळत नाही, अशी माहिती फूल विक्रेता वंदेश पाटील यानं दिली.

लॉकडाऊनमुळे एकाएकी बाजार बंद करावा लागला. रोज शेकडो टनांनी होणारी फुलांची उलाढाल थांबली. फुलांच्या दुकानात कामाला असणाऱ्या मजुरांचे हाल झाले. पण व्यापाऱ्यांनी मोठ्या मनाने या मजुरांना ३ महिने सांभाळलं, कोणाला गावी नेऊन सोडलं तर कुणाच्या तब्येतीची काळजी घेतली. मिशन बिगीन अगेन म्हणत आता फूल मार्केटही हळुहळू सुरू होऊ लागलंय. हाताला काम मिळू लागल्याने मजुरांच्या चेहऱ्यावरचा आनंद परतू लागलाय.



हेही वाचा -

यंदा ढोल-ताशांचा आवाज म्यूट!

नालासोपारा आगारात नाशिकहून २० चालक दाखल



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा