Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी २१२ कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी (२० ऑगस्ट) २१२ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी २१२ कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी (२० ऑगस्ट) २१२ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत.  तर ३ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये नवीन पनवेेलमधील २ आणि कामोठे येथील एका रुग्णाचा समावेश आहे. १३१ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.  

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये कळंबोली-रोडपाली येथील २४, कामोठ्यातील ४५, खांदा कॉलनीतील १७, खारघरमधील ४७, पनवेलमधील ३१,  नवीन पनवेलमधील ३४, तळोजा येथील १३ रुग्णाचा समावेश आहे.  

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण ९७८१ कोरोनाबाधित रूग्णांपैकी ८१०६ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून २५० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १४२५ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.



हेही वाचा -

मुंबईतील अनेक रुग्णालयं होणार नॉनकोविड

मुंबईत ऑगस्टमध्ये मलेरियाचे ५९२ रुग्ण




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा