भुयारी मेट्रोमुळे २६/११ हल्ल्यातील शहीदांच्या स्मारकाचे स्थलांतरण

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतर मरीन ड्राईव्हवरील पोलिस जिमखान्यात शहीदांचे स्मारक बांधण्यात आले होते. मात्र, मरीन ड्राईव्हच्या भूमिगत मेट्रोच्या कामामुळे हे स्मारक क्रॉफर्ड मार्केटजवळील मुंबई पोलिस मुख्यालयात नवीन आयुक्तांच्या कार्यालय इमारतीत हलवण्यात येणार आहे.

एका अहवालानुसार, हल्ल्याच्या १२ व्या वर्धापन दिनापूर्वी तीन दिवस आधी स्मारक स्थलांतरीत करण्याचं काम सुरू झालं आहे. २३ नोव्हेंबरपर्यंत हे काम संपण्याची शक्यता आहे. हे स्मारक कायमस्वरुपी नव्या ठिकाणी राहील, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), कुलाबा, कामा हॉस्पिटल आणि गिरगाव चौपाटी इथं २६/११ च्या हल्ल्यातील शहीद जवानांची स्मारक बांधलं गेलं आहे. २६ नोव्हेंबरला दरवर्षीप्रमाणे या स्मारकावर महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, मुंबई पोलिस आयुक्त आणि राज्यातील इतर उच्च मान्यवर शहीदांना श्रद्धांजली वाहतील.

२६/११ हल्ल्यात देशासाठी आपला प्राण देणाऱ्या काही प्रमुख नावांमध्ये तत्कालीन महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे होते. शहीद संदीप उन्नीकृष्णन, तत्कालीन मुंबई पोलिसांचे अतिरिक्त आयुक्त अशोक कामठे, तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय सालास्कर आणि सहाय्यक उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे हे इतर अनेक जण होते.

या हल्ल्यात शहीद झालेले मुंबई पोलिस, रेल्वे संरक्षण दलाचे (RPF), राज्य रेल्वे पोलिस (GRP), होमगार्ड्स आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) च्या १८ सैनिकांना श्रद्धांजली म्हणून हे स्मारक उभारले आहे.

२००८ मधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये १६६ लोक ठार आणि अनेक जखमी झाले होते. पाकिस्तानमधून दहा दहशतवादी समुद्री मार्गानं देशाच्या आर्थिक राजधानीत घुसले. मात्र, चार दिवसांच्या चकमकीनंतरएका दहशतवाद्याला जिवंत पकडले गेले होते. तर अन्य नऊ दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केलं होतं.


हेही वाचा

छठ पूजेसाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

एसबीआयने ग्राहकांना दिला 'हा' अलर्ट

पुढील बातमी
इतर बातम्या