Advertisement

एसबीआयने ग्राहकांना दिला 'हा' अलर्ट

स्टेट बँक ऑफ इंडिया ( एसबीआय) ने आपल्या ग्राहकांना अलर्ट राहण्याचं आवाहन केलं आहे. एसबीआयने ग्राहकांना अलर्ट करण्यासाठी एक व्हीडिओदेखील शेअर केला आहे.

एसबीआयने ग्राहकांना दिला 'हा' अलर्ट
SHARES

स्टेट बँक ऑफ इंडिया ( एसबीआय) ने आपल्या ग्राहकांना अलर्ट राहण्याचं आवाहन केलं आहे. एसबीआयच्या नावावर ग्राहकांना बनावट ईमेल पाठवला जात असल्याचं बँकेने म्हटलं आहे. याबाबत ग्राहकांनी सावध रहावं असं बँकेने ट्विटरद्वारे म्हटलं आहे. 

ट्विटमध्ये एसबीआयने म्हटलं की, एसबीआयच्या नावे जर तुम्हाला खोटा आणि बनावट ईमेल आला तर उत्तर देऊ नका.  ग्राहकांनी बँकेच्या नावे आलेला मेल खरा आहे की फसवणुकीसाठी आहे याची खात्री नक्की करून घ्यावी. बँक ग्राहकांना विनंती करत आहे की त्यांनी सोशल मीडियावर अलर्ट राहावे. कोणत्याही दिशाभूल आणि बनावट मेसेजद्वारे तुमची फसवणूक केली जाऊ शकते. यामुळे ग्राहकांनी कुठल्याही मेसेजवर आपली खासगी माहिती शेअर करण्याआधी तपासणी करावी.

एसबीआयने ग्राहकांना अलर्ट करण्यासाठी एक व्हीडिओदेखील शेअर केला आहे. यामध्ये आपली कोणतीही खासगी माहिती ऑनलाईन शेअर करू नका असं आवाहन ग्राहकांना केलं आहे.  कोणत्याही प्रकारच्या बँकिंग सेवांसाठी अधिकृत पोर्टलचाच वापर करा. जर तुम्ही या सूचनेकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल असा इशाराही एसबीआयने आपल्या ग्राहकांना दिला आहे.हेही वाचा -

बीपीसीएलसाठी खरेदीदार मिळेना, बोलीतून बड्या कंपन्यांची माघार

एसबीआयकडून गृहकर्जाच्या व्याजदरात कपातसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा