Advertisement

बीपीसीएलसाठी खरेदीदार मिळेना, बोलीतून बड्या कंपन्यांची माघार

भारत सरकारची सर्वात मोठी तेल कंपनी भारत पेट्रोलियमला (बीपीसीएल) विकण्याचा प्रयत्न भारत मागील पाच महिन्यांपासून सरकारने सुरू केला आहे. मात्र बीपीसीएलला खरेदी करण्यासाठी कोणतीही कंपनी अद्याप पुढे आलेली नाही.

बीपीसीएलसाठी खरेदीदार मिळेना, बोलीतून बड्या कंपन्यांची माघार
SHARES

भारत सरकारची सर्वात मोठी तेल कंपनी भारत पेट्रोलियमला (बीपीसीएल) विकण्याचा प्रयत्न भारत मागील पाच महिन्यांपासून सरकारने सुरू केला आहे. मात्र  बीपीसीएलला खरेदी करण्यासाठी कोणतीही कंपनी अद्याप पुढे आलेली नाही.चार वेळा निविदा मागविण्याची मुदत वाढवूनही कोणीही बीपीसीएल साठी बोली लावलेली नाही. भारत सरकारने बीपीसीएल विकण्यासाठी बोली लावण्यासाठी दिलेली चौथी मुदतही सोमवारी संपली. आता मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड बीपीसीएल विकत घेते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

बीपीसीएलमध्ये केंद्र सरकारचे ५२.९८ टक्के शेअर्स आहेत त्याची किंमत चार महिन्यांपूर्वी ८७, ३८८ कोटी रुपये होती. मात्र आता बीपीसीएलच्या शेअर्सची किंमत घसरल्याने आता शेअर्सची किंमत ६०, ००० कोटींवर आली आहे. ही कंपनी विकण्यासाठी १० अब्ज डॉलरची किंमत ठेवण्यात आली आहे.

अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीची गुजरातच्या जामनगर येथे ऑइल रिफायनरी आहे. त्यांना आता रिटेल क्षेत्रात उतरण्याची इच्छा असल्याने ते बीपीसीएल कंपनी घेऊ विकत शकतात. मात्र रिलायन्स इंडस्ट्रीजने आपली इच्छा अजून व्यक्त केलेली नाही. बीपीसीएलचे माजी अध्यक्ष सार्थक बहुरिया आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष संजीव सिंग या दोघांना रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या कंपनीत मोठ्या पदावर घेतले आहे. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज ही बीपीसीएल विकत घेईल हे स्पष्ट झाले आहे. आता रिलायन्स केव्हा बोली लावते याकडे सरकारचे लक्ष आहे.हेही वाचा -

भारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सिन' लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू

स्मारक की मातोश्री तीन??, मनसेचा खोचक प्रश्नRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा