Advertisement

छठ पूजेसाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

कोरोनाचा फैलाव होऊन नये यासाठी नागरिकांनी तलाव, समुद्राकाठी एकत्रित न येता गर्दी टाळावी व घरीच थांबून साध्या पद्धतीनेच छठपूजा साजरी करावी.

छठ पूजेसाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी
SHARES

कोरोनामुळे यंदा चा उत्तर भारतीयांचा छठपूजा उत्सव साधेपणाने साजरा करावा, असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. छठ पूजेसाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांचं पालन करावं असं  अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

मार्गदर्शक सूचना

१) कोरोनाचा फैलाव होऊन नये यासाठी नागरिकांनी तलाव, समुद्राकाठी एकत्रित न येता गर्दी टाळावी व घरीच थांबून साध्या पद्धतीनेच छठपूजा साजरी करावी.

२) महानगरपालिका, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी. तसंच कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरीता सुरक्षा व स्वच्छतेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात.

3) छठपूजा उत्सवाच्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचे मंडप उभारण्यात येऊ नयेत. कोणत्याही प्रकारचे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत. फटाक्यांची आतषबाजी व ध्वनीक्षेपणास बंदी असेल.

४) उत्तर भारतीय नागरीकांनी छठपूजेदरम्यान मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. ज्येष्ठ नागरीक व लहान मुलांना कार्यक्रमाच्या ठिकाणी आणू नये, यासंबंधी आयोजकांनी जनजागृती करावी.

५) छठपूजा कार्यक्रमाच्या ठिकाणी निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. तसंच सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनीटायझर) पाळण्याकडं विशेष लक्ष देण्यात यावे.

६) शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहीत केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सवाच्या दिवसाच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.हेही वाचा -

मध्य रेल्वे 'या' मार्गावर चालविणार ८ उपनगरी सेवा

कोरोना उपचार केंद्रातील तब्बल ६७ टक्के खाटा रिकाम्याRead this story in English or हिंदी
संबंधित विषय